एकनाथ शिंदे गुजरातमध्येच का गेले?; संजय राऊतांनी घेतलं चंद्रकांत पाटलांचं नाव
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल २६ आमदार सुरतमधील हॉटेलमध्ये असून, एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये का गेले, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव घेत स्फोटक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल २६ आमदार सुरतमधील हॉटेलमध्ये असून, एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये का गेले, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव घेत स्फोटक विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत मंगलप्रभात लोढा. त्यांनी मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. त्यांची पावलं कोणत्या दिशेनं पडताहेत, तुम्ही समजून घ्या. यासाठी फाटाफूट घडवून आणता आहात का. मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलं पाहिजे. शिवसेना दुबळी केली पाहिजे. हे फार मोठं कारस्थान, षडयंत्र आहे. तसं भाकित यापूर्वीच केलं होतं,” असा आरोप राऊत यांनी भाजपवर केलाय.
“शिवसेनेमध्ये आईचं दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही, हे परवा उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात म्हटलेलं होतं. त्याचा अर्थ समजून घ्या. शिवसेना निष्ठावंताची सैना आहे.”
‘महाराष्ट्रातून आमदार आलेत, हॉटेलची सुरक्षा वाढवा’; रात्री २ वाजता सुरतमध्ये काय घडलं?
“सत्तेसाठी आणि पदासाठी स्वतःला विकणारे, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद शिवसेनेत तयार होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले, त्यांची अवस्था आपण बघतोय. ज्यांची नावं मी सातत्यानं पाहतोय. त्यातील बरेचसे आमदार आता वर्षा बंगल्यावर आहेत. त्यांची नावं चुकीच्या पद्धतीनं घेतलीये,” असं म्हणत राऊतांनी काही आमदार शिंदे यांच्यासोबत नसल्याचं म्हटलंय.