गदाधारी नाही तुम्ही तर ‘गधाधारी’, देवेंद्र फडणवीसांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली
ऋत्विक भालेकर, प्रतिनिधी, मुंबई आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. घंटाधाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी बेस्टच्या कार्यक्रमात म्हणाले होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमचं हिंदुत्व गदाधारी आहे की नाही माहित नाही. तुमच्याकडे पाहून मात्र तुम्ही ‘गधाधारी’ आहात याची खात्री पटते असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ‘अमित शाह आणि […]
ADVERTISEMENT

ऋत्विक भालेकर, प्रतिनिधी, मुंबई
आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. घंटाधाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी बेस्टच्या कार्यक्रमात म्हणाले होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमचं हिंदुत्व गदाधारी आहे की नाही माहित नाही. तुमच्याकडे पाहून मात्र तुम्ही ‘गधाधारी’ आहात याची खात्री पटते असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत.