Axar Patel : लग्नानंतर क्रिकेटर अक्षरचं बदललं नशीब? आयपीएलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी…
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचं नशीब लग्नानंतर बदलताना दिसत आहे. अक्षर पटेल त्याची ग्रर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत 26 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडाकला. लग्नानंतर अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी मालिका खेळली आहे. या सीरीजमध्ये अक्षर पटेलने गोलंदाजीत कमाल दाखवली नाही आणि केवळ 3 विकेट घेतले. पण अक्षरने फलंदाजीत तुफानी खेळी केली. 264 धावा करत […]
ADVERTISEMENT

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचं नशीब लग्नानंतर बदलताना दिसत आहे.
अक्षर पटेल त्याची ग्रर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत 26 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडाकला.
लग्नानंतर अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी मालिका खेळली आहे.
या सीरीजमध्ये अक्षर पटेलने गोलंदाजीत कमाल दाखवली नाही आणि केवळ 3 विकेट घेतले.
पण अक्षरने फलंदाजीत तुफानी खेळी केली. 264 धावा करत मालिकेतील तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला.
आता अक्षरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरीज खेळायची आहे, पण त्याआधी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
अक्षर पटेल वनडे सीरीजनंतर आयपीएल 2023 सीझनमधील दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळणार आहे.
आयपीएलपूर्वी दिल्ली संघाने अक्षर पटेलला आपल्या संघाचा उपकर्णधार बनवलं आहे.
तसंच, कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नर दिल्ली संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.