PakVsAus: पाकिस्तानच्या पराभवानंतर मिम्सचा महापूर; तुम्हालाही आवरणार नाही हसू

T20 WC : टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला... या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूरचं आल्याचं पाहायला मिळालं...
PakVsAus: पाकिस्तानच्या पराभवानंतर मिम्सचा महापूर; तुम्हालाही आवरणार नाही हसू
सोशल मीडियावर पाकिस्तानबद्दल मिम्सचा पडला पाऊस... Twitter

टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरीतील दुसरी लढतही रोमहर्षक ठरली. पाकिस्तान विजयाच्या समीप असतानाच ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड केलेल्या फलंदाजीने सामन्याचा निकालच बदलला. विजयरथ रोखत ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांचा चुराडा केला. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानबद्दल मिम्सचा वर्षाव पडला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना गुरुवारी खेळवण्यात आला. या सामन्यात समाधानकारक आव्हान दिल्यानंतरही पाकिस्तानाला पराभवाला सामोरं जावं लागलं. मार्कस स्टॉयनिसची जबाबदार खेळी आणि मॅथ्यू वेडने षटकारांची आतषबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या विजयानंतर पाकिस्तान संघाची खिल्ली उडवणारे मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले...

सोशल मीडियावर पाकिस्तानबद्दल मिम्सचा पडला पाऊस...
T20 World Cup : कांगारुंच्या शेपटाचा पाकिस्तानच्या विजयरथात अडसर, ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

...तर पाकिस्तानचा विजय झाला असता

१५व्या षटकानंतर सामन्याचं चित्र बदललं. वेड आणि स्टॉयनिक्सने फटकेबाजी केली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात २२ धावा आवश्यक होत्या. १९वं षटक शाहीन शाह आफ्रिदीने टाकलं. आफ्रीदीने भेदक मारा करत दडपण आणलं आणि या दडपणाखाली वेडने फटका मारला. मात्र, हसन अलीकडून हा झेल सुटला. जीवदान मिळालेल्या वेडने तीन षटकारांची आतषबाजी करत विजयाचा घास पाकिस्तानच्या हिसकावून घेतला. हसन अलीकडून झेल सुटला नसता, तर सामन्याचा निकाल वेगळाही लागू शकला असता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in