विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची गाडी रुळावर; पाकिस्तानचा विक्रम मोडत गाठलं अव्वल स्थान
टी-20 विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये टीम इंडियाची निराशा झाली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या टी-20 मालिकेत भारताने अप्रतिम खेळ दाखवत मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मिशन टी-20 विश्वचषकापूर्वी, सध्याच्या विश्वविजेत्याविरुद्ध भारताचा विजय मनोबल वाढविण्याचे काम करेल. विश्वचषकापूर्वी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत टीम इंडियासाठी अनेक आनंदाच्या बातम्याही आल्या आहेत. वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव […]
ADVERTISEMENT

टी-20 विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये टीम इंडियाची निराशा झाली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या टी-20 मालिकेत भारताने अप्रतिम खेळ दाखवत मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मिशन टी-20 विश्वचषकापूर्वी, सध्याच्या विश्वविजेत्याविरुद्ध भारताचा विजय मनोबल वाढविण्याचे काम करेल. विश्वचषकापूर्वी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत टीम इंडियासाठी अनेक आनंदाच्या बातम्याही आल्या आहेत.
वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने शेवटच्या षटकात विजय मिळवला. यासह भारताने 3 सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे. टीम इंडिया टी-20 मध्ये नंबर 1 टीम आहे, तर ऑस्ट्रेलिया सध्या टी-20 चा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्यामुळेच साऱ्या जगाच्या नजरा तिन्ही सामन्यांवर लागल्या होत्या.
पहिला सामना: ऑस्ट्रेलिया 4 विकेटने जिंकला
दुसरा सामना: भारत 6 विकेटने जिंकला (8-8 षटकांचा सामना)