Ind vs Aus 2nd ODI: आजच्या भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवर मोठं सकंट, जाणून घ्या ताजे अपडेट्स
Ind vs Aus Live Match: भारत (India) वि. ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यात आज (19 मार्च) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे दुसरा वननडे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. (clouds of crisis on india australia […]
ADVERTISEMENT

Ind vs Aus Live Match: भारत (India) वि. ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यात आज (19 मार्च) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे दुसरा वननडे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. (clouds of crisis on india australia second odi know the latest weather update of visakhapatnam)
विशाखापट्टणम दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान चाहते विशाखापट्टणममधील हवामानावरही लक्ष ठेवून आहेत. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. सामना सुरू असताना चांगला सूर्यप्रकाश असेल पण त्यात बदलही होऊ शकतो. सायंकाळी 3 ते 5 दरम्यान पावसाची सध्या शक्यता वर्तवली जात आहे. सामन्यादरम्यान आर्द्रता 81 टक्के आणि दवबिंदू (Dew Point) 21 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
Accuweather नुसार हवेची गुणवत्ता चांगली असेल. एकूणच, सामन्यादरम्यान 76 टक्के ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्येही आज सकाळी जोरदार पाऊस झाला. पण या क्षणाचे ताजे अपडेट म्हणजे पाऊस तूर्तास तरी थांबला आहे आणि आकाशही निरभ्र झाले आहे. खेळ वेळेवर सुरू होईल अशी आशा आहे.
Ind Vs Aus, 2nd ODi: रोहित शर्मा संघात परतल्यास ‘या’ खेळाडूला जावं लागणार बाहेर