Virat Kohli: विराट कोहलीने कसोटीचं कर्णधारपदही सोडलं, अफ्रिकेतील पराभवानंतर मोठा निर्णय
जोहान्सबर्ग: दक्षिण अफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं असल्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने ट्विटरवर एक मेसेज शेअर करून याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने आपल्या मेसेजमध्ये लिहिलं की, ‘गेली सात वर्षे सातत्याने मेहनत आणि दैनंदिन प्रयत्नांमुळे संघाला योग्य दिशेने नेले जात आहे. मी […]
ADVERTISEMENT

जोहान्सबर्ग: दक्षिण अफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं असल्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने ट्विटरवर एक मेसेज शेअर करून याची घोषणा केली आहे.
विराट कोहलीने आपल्या मेसेजमध्ये लिहिलं की, ‘गेली सात वर्षे सातत्याने मेहनत आणि दैनंदिन प्रयत्नांमुळे संघाला योग्य दिशेने नेले जात आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि कोणतीही कसर सोडली नाही. पण प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो, माझ्यासाठी कसोटी कर्णधारपद संपवण्याची हीच योग्य वेळ आहे.’
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
विराट कोहलीने आपल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण प्रयत्नात कोणीही कसर केली नाही. मी नेहमीच माझे 120 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे, जर मी काही करू शकत नाही तर मला वाटते की ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही.’
‘या निर्णयावर मला पूर्ण खात्री आहे आणि मी आपल्या संघाची फसवणूक करू शकत नाही.’ या मेसेजमध्ये विराट कोहलीने बीसीसीआयचे आभार मानले, तसेच रवी शास्त्री आणि उर्वरित सपोर्ट स्टाफचेही आभार मानले आहेत.