Ind vs Aus: तीन खेळाडूंना आराम? तिसऱ्या वनडेत कशी असेल प्लेईंग 11? - Mumbai Tak - ind vs aus three players relieved how will the playing be in the third odi 11 - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

Ind vs Aus: तीन खेळाडूंना आराम? तिसऱ्या वनडेत कशी असेल प्लेईंग 11?

Ind vs aus 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च (बुधवार) रोजी चेन्नई (Chennai) येथे होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाच गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना 10 गडी राखून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक […]

Ind vs aus 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च (बुधवार) रोजी चेन्नई (Chennai) येथे होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाच गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना 10 गडी राखून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरला असून विजयी संघ वनडे मालिकेवर (ODI Series) कब्जा करेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. (Three players relieved? How will the playing be in the third ODI 11)

सूर्यकुमार यादव प्लेइंग-11 मधून बाहेर होणार का?

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही चाहत्यांच्या नजरा भारतीय संघाच्या कॉम्बिनेशनवर असणार आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसमोर टीम इंडियाची अव्वल फळी ज्या पद्धतीने कोलमडली, तो चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमार यादवची कामगिरी खूपच लाजिरवाणी होती. तो दोन्ही सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. अशा स्थितीत सूर्यकुमारला तिसऱ्या वनडेत संधी मिळते की नाही हे पाहावे लागेल.

रोहित शर्माने सूर्यकुमारला अधिक संधी देण्याचे संकेत दिले आहेत. दुसरा वनडे संपल्यानंतर रोहित म्हणाला होता, ‘श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल आम्हाला माहिती नाही. श्रेयसची जागा रिक्त आहे, त्यामुळे आम्ही सूर्यालाच मैदानात उतरवू. ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांना संधी मिळेल, असे मी अनेकदा सांगितले आहे. सूर्याला माहित आहे की त्याला वनडेतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सक्षम खेळाडूंना पुरेशा संधी दिल्या गेल्या नाहीत असे कधीच वाटू नये. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला पण त्याला सलग सात आठ किंवा दहा सामने द्यावे लागतील, असं रोहित म्हणाला.

IND vs AUS: सूर्यकुमार यादववर सुनील गावस्कर भडकले, नेमकं काय घडलं?

चेन्नईची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजांना मदत करेल

चेपॉक येथील खेळपट्टी साधारणपणे संथ असते. सामन्याच्या दिवशीही पावसाचा अंदाज आहे, म्हणजे डावाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल. गेल्या वेळी भारत येथे खेळला तेव्हा खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली. त्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने 288 धावांचे लक्ष्य केवळ दोन गडी गमावून पूर्ण केले. यावेळीही गोलंदाजी करणाऱ्या खेळपट्टीमुळे भारतीय फलंदाजांना पहिल्या 10 षटकांमध्ये विशेषत: मिचेल स्टार्कविरुद्ध अत्यंत सावधपणे खेळावे लागणार आहे.

Ind vs Aus : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टाईल विजय

हे खेळाडू प्लेइंग-11 मधून बाहेर असू शकतात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत आक्रमक रणनीती अवलंबत भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. अशा स्थितीत शार्दुल ठाकूर किंवा उमरान मलिक यांना खेळण्याची संधी मिळू शकते. उमरान मलिकला खेळण्याची अधिक संधी मिळत आहे कारण त्याच्याकडे अतिरिक्त वेग आहे जो या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो.

उमरान किंवा शार्दुल ठाकूर खेळल्यास अक्षर पटेलला बाहेर राहावे लागू शकते. यासोबतच भारतीय संघ व्यवस्थापन चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग-11 मध्ये सामील करू शकते. सुंदर चेंडूसोबतच तो बॅटनेही उपयुक्त ठरू शकतो. बॅटिंग लाइनअपमध्ये बदल होण्याची शक्यता नाही.

Ind vs Aus: भारताचा लाजिरवाणा पराभव, रोहित शर्मा फलंदाजांवर संतापला

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…