Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, सुर्या-राहुलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

प्रशांत गोमाणे

भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बोर्डाला विनंती केली की ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि वनडे खेळणार नाहीत.

ADVERTISEMENT

ind vs sa team india squad announced for south africa tour t20 odi rohit sharma virat kohli rest
ind vs sa team india squad announced for south africa tour t20 odi rohit sharma virat kohli rest
social share
google news

Team India Squad Announcement : दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर) दिल्लीतील तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. टी-20ची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे, तर केएल राहुल एकदिवसीय मालिकेची कमान सांभाळणार आहे. कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. (ind vs sa team india squad announced for south africa tour t20 odi rohit sharma virat kohli rest)

भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बोर्डाला विनंती केली की ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि वनडे खेळणार नाहीत. तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे.

हे ही वाचा : Exit Poll 2023: लोकसभेची सेमीफायनल, पाहा 5 राज्यांचा Poll of Polls, कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?

वनडे संघात संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले आहे. रजत पाटीदार, साई सुदर्शन या नव्या चेहऱ्यांचाही संघात संघी मिळाली आहे.युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांनाही संघात स्थान मिळाले आहे. तर शुभमन गिलला वनडे संघात संधी मिळालेली नाही. सूर्याही वनडे संघातूनही गायब आहे.

जसप्रीत बुमराह आता कसोटी संघाचा उपकर्णधार असेल.तर केएस भरतला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. आता कसोटी संघात केएल राहुल आणि इशान किशन हे विशेषज्ञ यष्टीरक्षक आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp