Ind vs Aus Final Analysis: …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं
india vs australia final analysis in marathi : टीम इंडियाला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून भारताचा पराभव केला. भारताच्या पराभवासाठी 5 गोष्टी कारणीभूत ठरल्या.
ADVERTISEMENT

India vs Australia Final Match Analysis : टीम इंडियाचा विजयरथ ऑस्ट्रेलियालाही रोखणं अवघड जाईल असं वाटत असतानाच भारतीयांच्या पदरी निराशा पडली. आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. टीम इंडियाने स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारत विजेतेपद पटकावून इतिहास रचेल, असे देशवासीयांना वाटत होते. पण, स्वप्नभंग झाला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला. 5 वेळा जगज्जेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाशी टीम इंडियाचा सामना झाला. या सामन्यात विजयरथावर स्वार झालेला भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले.
फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही संघ फ्लॉप ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने 240 धावा केल्या आणि स्पर्धेत प्रथमच सर्वबाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 4 विकेट्स गमावून सामना आणि विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाला पाच कारणीभूत ठरली.
Heads high, hearts proud 🇮🇳#CWC23 pic.twitter.com/K5X67lvjgt
— ICC (@ICC) November 19, 2023