लग्नाच्या तयारीसाठी जसप्रीत बुमराह सुट्टीवर?? चर्चांना उधाण

मुंबई तक

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होण्याआधी खासगी कारणं देऊन सुट्टी घेतली. बीसीसीआयनेही बुमराहला सुट्टी देत याबद्दलची अधिकृत घोषणा केली. चौथ्या टेस्टसाठी बुमराहच्या जागेवर मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं. परंतू मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार जसप्रीत बुमराहने आपल्या लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेतल्याचं कळतंय. आपले जवळचे मित्र आणि परिवारातील काही सदस्यांच्या उपस्थितीत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होण्याआधी खासगी कारणं देऊन सुट्टी घेतली. बीसीसीआयनेही बुमराहला सुट्टी देत याबद्दलची अधिकृत घोषणा केली. चौथ्या टेस्टसाठी बुमराहच्या जागेवर मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं. परंतू मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार जसप्रीत बुमराहने आपल्या लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेतल्याचं कळतंय.

आपले जवळचे मित्र आणि परिवारातील काही सदस्यांच्या उपस्थितीत जसप्रीत बुमराह गोव्यात लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराह आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. जसप्रीत बुमराहने सुट्टी घेतल्यानंतर अनुपमाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर आपण राजकोटला जात असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे बुमराह आणि अनुपमा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

चौथ्या टेस्ट मॅचमधून सुट्टी घेतल्यानंतर बुमराहला आता भरपूर कालावधी आपल्या परिवारासोबत घालवायला मिळणार आहे. इंग्लंडविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत बुमराहची भारतीय संघात निवड झालेली नाही. यानंतर पुण्यात खेळवण्यात येणाऱ्या ३ वन-डे सामन्यांच्या सिरीजसाठी त्याची संघात निवड होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे बुमराहने नेमकी कोणत्या कारणासाठी सुट्टी घेतली आहे…हे येणाऱ्या काळात स्ष्ट होईल अशी सर्व फॅन्सना आशा आहे.

अवश्य वाचा – Video : मैदानात भिडले बेन स्टोक्स आणि विराट कोहली

हे वाचलं का?

    follow whatsapp