Ind Vs Sa: Virat Kohli दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर, कोणाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा?
Virat Kohli, Ind Vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहली हा या सामन्यात खेळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता केएल राहुल हा संघाचं नेतृत्व करत आहे. केएल राहुलने टॉसच्या वेळी […]
ADVERTISEMENT

Virat Kohli, Ind Vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहली हा या सामन्यात खेळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता केएल राहुल हा संघाचं नेतृत्व करत आहे.
केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, ‘विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल अशी आशा आहे.’
विराट कोहलीसाठी हा सामना खास होता, कारण हा त्याचा 99 वा कसोटी सामना होता. या सामन्यात विराट कोहली खेळला असता तर मालिकेतील शेवटचा सामना हा 100वा कसोटी सामना ठरला असता. पण आता तसे होणार नाही, कारण तिसरी कसोटी हा त्याचा 99वा सामना असेल आणि 100 व्या कसोटी सामन्यासाठी आता त्याला पुढील दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.
प्लेइंग-11 बद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या ऐवजी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. हनुमा विहारी दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा सामना खेळला होता.