T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेने काढली भारतीय बॅटिंग ऑर्डरची हवा; लुंगी एन्गिडीचा जलवा

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला.
T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेने काढली भारतीय बॅटिंग ऑर्डरची हवा; लुंगी एन्गिडीचा जलवा

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पूर्णपणे गुडघे टेकले आहेत. T20 विश्वचषक 2022 मध्ये, भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर टीम इंडिया पूर्णपणे अपयशी ठरली आणि अर्धी टीम 50 धावापूर्वीच बाद झाली.

पर्थमधील WACA मैदानावर भारतीय संघाच्या पडझडीची सुरुवात कर्णधार रोहित शर्माच्या विकेटने झाली, जो मोठा फटका खेळून बाद झाला. आणि त्यानंतर टीम इंडियाच्या विकेट पडण्याची जणू ओढ लागली होती. लवकरच, भारताची धावसंख्या 49 वर पाच विकेट्स अशी झाली. अखेर या सामन्यात भारताने केवळ 133 धावा केल्या आणि 9 विकेट गमावल्या.

टीम इंडियासाठी फक्त सूर्यकुमार यादवच मोठी धावसंख्या उभारू शकला, त्याने 68 धावांची खेळी केली. सूर्यानंतर कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या, ज्याची धावसंख्या 15 होती.

अशा पडल्या टीम इंडियाच्या विकेट्स...

• पहिली विकेट - रोहित शर्मा (15 धावा) 23-01, 4.2 षटके

• दुसरी विकेट - केएल राहुल (9 धावा) 26-2, 4.6 षटके

• तिसरी विकेट- विराट कोहली (12 धावा) 41-3, 6.5 षटके

• चौथा विकेट - दीपक हुडा (0 धावा) 42-4, 7.3 षटके

• पाचवी विकेट - हार्दिक पंड्या (2 धावा) 49-5, 8.3 षटके

• सहावी विकेट - दिनेश कार्तिक 101-6, 15.1षटके

• सातवी विकेट - रविचंद्रन अश्विन 124-7, 18.1 षटके

• आठवी विकेट - सूर्यकुमार यादव 127-8, 18.5 षटके

• नववा विकेट - मोहम्मद शमी 130-9, 19.4 षटके

लुंगी एन्गिडीचा जलवा

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर टीम इंडियाची अवस्था दयनीय झाली. सर्वात प्राणघातक हल्ला लुंगी एनगिडीने केला होता. ज्याने आपल्या सुरुवातीच्या स्पेलच्या 3 षटकात 17 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. वेन पारनेल, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया आणि कागिसो रबाडा यांची वेगवान गोलंदाजी टीम इंडियाला सहन करता आली नाही. एनरिक नॉर्शियालाही सुरुवातीला विकेट मिळाली. या बॉलिंग ऑर्डरने भारताच्या बॅटिंग ऑर्डरची हवाच काढून टाकली.

के.एल राहुलचा फ्लॉप शो

के.एल राहुलचा फ्लॉप शो टीम इंडियासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरला आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार के.एल राहुल पुन्हा एकदा पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध फ्लॉप झाला आणि केवळ 9 धावा करून बाद झाला. के.एल राहुलने पाकिस्तानविरुद्ध 4 आणि नेदरलँडविरुद्ध 9 धावा केल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in