IPL 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सची यंदा अशी गत का झाली? जाणून घ्या कारणं…
युएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आतापर्यंत दोन संघांनी प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ प्ले-ऑफमध्ये दाखल झाले आहेत. सध्या साखळी फेरीत चौथ्या स्थानासाठी कोलकाता, मुंबई, पंजाब या संघांमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. परंतू यंदाच्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी काहीशी डामाडौल राहिली. पाचवेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला यंदाच्या हंगामात […]
ADVERTISEMENT

युएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आतापर्यंत दोन संघांनी प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ प्ले-ऑफमध्ये दाखल झाले आहेत. सध्या साखळी फेरीत चौथ्या स्थानासाठी कोलकाता, मुंबई, पंजाब या संघांमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. परंतू यंदाच्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी काहीशी डामाडौल राहिली.
पाचवेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला यंदाच्या हंगामात आपली लय पकडता आलीच नाही. पहिल्या सत्रात भारतामध्ये आणि दुसऱ्या सत्रात युएईत मुंबई इंडियन्सचं तळ्यात-मळ्यात सुरुच होतं. युएईत दाखल झाल्यानंतर पंजाबविरुद्ध सामन्यात विजय सोडला तर मुंबईच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे असं नेमकं झालं तरी काय की गतविजेत्या मुंबई संघावर अशी वेळ आली? जाणून घेऊयात कारणं…
कारण पहिलं – सूर्यकुमार आणि इशान किशनचं अपयश
मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीचं सर्वात मोठं कारण आहे दोन्ही खेळाडूंचा फॉर्म खराब असणं. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी- कॉक हे संघाला चांगली सुरुवात करुन देत असले तरीही त्यांच्या कामगिरीत सातत्य नाहीये. सूर्यकुमार आणि इशान किशन फॉर्मात नसल्यामुळे मुंबईला मधल्या फळीत अनेक बदल करावे लागले, ज्यामुळे हा संघ यंदा स्थिरावलेलाच दिसला नाही. कधी इशान किशन तर कधी सौरभ तिवारी यामध्येच मुंबईचा संघ अडकून राहिला.