IPL 2022 : Bumrah is Back ! 5 विकेट घेत दणक्यात पुनरागमन, KKR च्या डावाला खिंडार

कोलकात्याला 165 धावांत गुंडाळण्यात मुंबई इंडियन्सला यश
IPL 2022 : Bumrah is Back ! 5 विकेट घेत दणक्यात पुनरागमन, KKR च्या डावाला खिंडार
फोटो सौजन्य - BCCI

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात आपली जुनी चमक दाखवली आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 4 ओव्हरमध्ये 10 रन्स देत कोलकात्याचा निम्मा संघ गारद केला.

यंदाचा संपूर्ण हंगाम मुंबई इंडियन्ससोबत जसप्रीत बुमराहसाठीही खडतर गेला होता. आतापर्यंतच्या सामन्यात बुमराहला आपली विशेष छाप पाडता आली नव्हती. परंतू कोलकात्याविरुद्ध सामन्यात टिच्चून मारा करत जसप्रीत बुमराहने आपण फॉर्मात परतल्याचं दाखवून दिलं.

यावेळी जसप्रीत बुमराहने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत.

यंदाच्या संपूर्ण हंगामात जसप्रीत बुमराहला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. परंतू कोलकात्याविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराहला आपला जुना सूर गवसल्याचं पहायला मिळालं.

बुमराहच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्व स्तरातून कौतुक होताना पहायला मिळत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीवीर अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा आणि मधल्या फळीत रिंकू सिंगने मुंबईच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकात्याचा संघ 165 धावांपर्यंत मजल मारु शकला. दरम्यान मुंबईकडून कुमार कार्तिकेय सिंगने 2 तर डॅनिअल सम्स आणि मुरगन आश्विनने 1-1 विकेट घेत बुमराहला चांगली साथ दिली.

IPL 2022 : Bumrah is Back ! 5 विकेट घेत दणक्यात पुनरागमन, KKR च्या डावाला खिंडार
IPL 2022 : Mumbai Indians ला धक्का, सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर

Related Stories

No stories found.