IPL 2023 players retention : 10 खेळाडूंवर पडला होता पैशांचा पाऊस, यंदा संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता

IPL 2023 Released Players : आयपीएलच्या मागच्या हंगामात या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी लागली होती मोठी बोली
IPL 2023 players retention : 10 खेळाडूंवर पडला होता पैशांचा पाऊस, यंदा संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता

आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी खेळाडूंची रिटेंशन लिस्ट समोर आलीये. बहुतांश संघांनी महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं आहे. तर काही संघांशी लिलावाच्या आधी मोठे बदल केलेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन आणि निकोलस पूरनला संघातून बाहेर करण्यात आलंय. पंजाब किग्जनेही संघाचा माजी कर्णधार मयंक अग्रवालला बाहेरचा रस्ता दाखवलाय.

आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी २३ डिसेंबरला लिलाव होणार आहे. खेळाडूंच्या लिलावापूर्वी संघांनी मोठे बदल केले असून, काही खेळाडूंना सुट्टी म्हणजेच संघातून बाहेर केलंय. यात १० खेळाडू असे आहेत, ज्यांना मागील हंगामात जास्त बोली लावून खरेदी केलं गेलं होतं.

केन विल्यमसन (14 कोटी)

सनरायझर्स हैदराबादने कर्णधार केन विल्यमसनला संघातून बाहेर केलंय. सनरायझर्स हैदराबादने 2022 मध्ये विल्यमसनला 14 कोटी देऊन रिटेन केलं होतं. मात्र, त्याला चांगली कामगिरी न करता आल्यानं हैदराबादने संघातून सुट्टी केलीये. विल्यमसनने 2022 च्या आयपीएलमध्ये 19.64 च्या सरासरीने फक्त 216 धावा केल्या होत्या.

मयंक अगरवाल (12 कोटी)

पंजाब किंग्जने आयपीएल 2022 च्या हंगामासाठी मयंक अगरवालला 12 कोटी रुपये देऊन रिटेन केलं होतं. गेल्या हंगामात मयंकवर कर्णधार पदाचीही जबाबदारी होती. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. काही दिवसांपूर्वीच पंजाब किंग्जने शिखर धवनला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला. मयंकने 2022 च्या आयपीएलमध्ये 16033 च्या सरासरीने 196 धावा केल्या होत्या.

शार्दुल ठाकूर (10.75 कोटी)

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 च्या लिलावाआधी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला 10.75 कोटी मध्ये खरेदी केलं होतं. शार्दुल ठाकूरला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला संघाने डच्चू दिलाय. शार्दुलने गेल्या हंगामात दिल्लीकडून खेळताना 14 सामन्यात 120 धावा आणि 15 गडी बाद केले होते.

निकोलस पूरन (10.75 कोटी)

सनरायझर्स हैदराबादने वेस्ट इंडिजचा खेळाडू निकोलस पूरनला 10.75 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. निकोलस पूरनला चांगली कामगिरी करता आली नाही. हैदराबाद संघ व्यवस्थापनाने त्याला संघातून बाहेर केलंय. पूरनने गेल्या हंगामात 14 सामन्यात 306 धावा केल्या होत्या.

लॉकी फर्ग्युसन (10 कोटी)

जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसनची कामगिरी चांगली राहिली नाही. त्यामुळे संघाने त्याला रिलीज केलंय. कोलकाता नाईट रायडर्सने ट्रेडिंगच्या माध्यमातून लॉकी फर्ग्युसनला आपल्या संघात घेतलंय. फर्ग्युसनने गेल्या हंगामात 13 सामन्यात 12 गडी बाद केले होते.

जेसन होल्डर (8.75 कोटी)

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या 2022 च्या हंगामासाठी जेसन होल्डरला 8.75 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला चांगली कामगिरी करता आली नाही. 12 सामन्यात होल्डरने 14 गडी बाद केले होते, तर 58 धावा केल्या होत्या.

पॅट कमिन्स (7.25 कोटी)

कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सवर विश्वास दाखवत मोठी किंमत लावली होती. मात्र, 2022 च्या हंगामात कमिन्सला चांगली कामगिरी करता आली नाही. कमिन्सने 5 सामन्यात 7 गडी बाद केले होते. आता केकेआरने कमिन्सला रिलीज केलंय. कमिन्सने आता पुढच्या सीझनमध्ये खेळण्यास नकार दिलाय.

शिवम मावी (7.25 कोटी)

कोलकाता फ्रेंचायजीने आयपीएल 2022 च्या लिलावात शिवम मावीला मोठी बोली लावली होती. 7.25 कोटी मध्ये शिवम मावीला खरेदी केलं होतं. 15व्या हंगामात मावीने 6 सामन्यात 7 गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला संघातून रिलीज करण्यात आलंय.

ओडियन स्मिथ (6 कोटी)

पंजाब किंग्जने वेस्ट इंडिजचा खेळाडू ओडियन स्मिथला रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. जलदगती गोलंदाज स्मिथला पंजाबने 6 कोटींमध्ये खरेदी केलं होतं.

कायरन पोलार्ड (6 कोटी)

अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने रिटेंशन यादी येण्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली. कायरन पोलार्डला रिटेन करण्याबद्दल मुंबई इंडियन्सची भूमिका नकारात्मक होती. कायरन पोलार्डला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डवर फलंदाज प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिलीये.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in