‘महाराष्ट्र केसरी’त रंगली दोस्तांमध्ये कुस्ती! सिकंदर शेखने माऊली जमदाडेला दाखवलं अस्मान
दोस्तीत कुस्ती नको असं आपण म्हणतो, पण साताऱ्यात सुरू असलेल्या ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज असाच सामना बघायला मिळाला. एकाच तालमीत तयार झालेल्या दोन जिगरी दोस्तांमध्ये लाल मातीत लढत झाली. यात पैलवान सिकंदर शेखने माऊली जमदाडेला अस्मान दाखवलं. ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज अमरावतीचा पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध वाशिमचा पैलवान सिकंदर शेख या […]
ADVERTISEMENT

दोस्तीत कुस्ती नको असं आपण म्हणतो, पण साताऱ्यात सुरू असलेल्या ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज असाच सामना बघायला मिळाला. एकाच तालमीत तयार झालेल्या दोन जिगरी दोस्तांमध्ये लाल मातीत लढत झाली. यात पैलवान सिकंदर शेखने माऊली जमदाडेला अस्मान दाखवलं.
६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज अमरावतीचा पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध वाशिमचा पैलवान सिकंदर शेख या जिगरी दोस्तांमध्ये माती गटात सेमी फायनलची कुस्ती झाली. हे दोघेही कोल्हापूर येथील गांगवेश तालमीत सराव करतात. त्यामुळे दोघांना एकमेकांचे डावपेच माहीत होते.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा : गादी गटातून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटीलची फायनलमध्ये मुसंडीया लढतीत सिकंदर शेख याने माऊली जमदाडे याला चितपट केलं. या लढतीत सिकंदर याने ६ विरुद्ध १ गुणांनी विजय मिळवला. यानिमित्ताने दोन मित्रांमधील लढत कुस्तीप्रेमींना बघायला मिळाली.
२०१९ मधील उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता सिकंदर शेख यांच्यात जबरदस्त लढत बघायला मिळाली. दोघांमधील लढत पाहण्यासाठी यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
महत्त्वाचं म्हणजे दोघे एकाच तालमीत सराव करत असल्याने लढतीदरम्यान दोघांनीही कोच न घेण्याचा घेतला निर्णय घेतला होता.