VIDEO: कोहली-स्टॉयनिस भिडले, मैदानातच धक्काबुक्की.. नंतर घडलं असं काही…

रोहिणी ठोंबरे

Marcus Stoinis Clashed with Virat Kohli : टीम इंडिया (India) विरूद्धचा तिसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियाने (Austtalia) 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार अॅडम झंपा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) आणि मार्कस स्टॉइनिसमध्ये (Marcus Stoinis) मैदानातच धक्काबुक्की झाल्याची घटना […]

ADVERTISEMENT

कोहली-स्टॉयनिसमध्ये मैदानातच राडा
कोहली-स्टॉयनिसमध्ये मैदानातच राडा
social share
google news

Marcus Stoinis Clashed with Virat Kohli : टीम इंडिया (India) विरूद्धचा तिसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियाने (Austtalia) 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार अॅडम झंपा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) आणि मार्कस स्टॉइनिसमध्ये (Marcus Stoinis) मैदानातच धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या धक्काबुकीवर विराट चांगलाच भडकला होता. क्रिकेट फॅन्स देखील या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करतायत.(marcus stoinis clashed with virat kohli pushed them in ground video viral in social media)

व्हिडिओत काय?

टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 21 व्या ओव्हरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. यावेळी मैदानावर के एल राहूल आणि विराट कोहली (Virat Kohli) खेळत होता. तर ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) गोलंदाजीसाठी आला होता. स्टॉइनिसने बॉल टाकल्यानंतर राहूलने तो डॉट केला होता. हा बॉल टाकून झाल्यानंतर तो पुन्हा रन अपच्या दिशेने येत होता. यावेळी विराट देखील क्रिसवर चालत होता. दोघेही एकमेकांसमोर आले आणि त्यांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीनंतर विराट खुपच रागवला होता. मात्र दोन्ही खेळाडूंनी यावर मौन बाळगत खेळ पुढे सुरु ठेवला होता.

Ind vs Aus :टीम इंडियाचा शेवट कडू; ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका घातली खिशात

दरम्यान या दोघांचा मैदानातील धक्काबुक्कीचा हा व्हिडिओ पाहून क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला. अनेकांना नेमकं प्रकरणच कळालं नाही. कारण दोघांनीही एकमेंकाना धडक दिली. या धडकेनंतर विराटने (Virat Kohli) रागाच्या नजरेने त्याच्याकडे पाहिले मात्र स्टॉइनिस त्याला काही उत्तर न देता हसत हसत पुढे गेला. या संपुर्ण मैदानावरील राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp