T20 WC, Aus Vs Pak: ...म्हणून पाकिस्तान हरलं, 'त्या' एका बॉलने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं!

Aus Vs Pak Hasan Ali drop Matthew Wade catch: टी-20 च्या सेमीफायनलमध्ये अगदी मोक्याच्या क्षणी कॅच सोडण्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागली आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
T20 WC, Aus Vs Pak: ...म्हणून पाकिस्तान हरलं, 'त्या' एका बॉलने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं!
pakistan vs australia t20 world cup semifinal match hasan ali drop matthew wade catch pak lost match

T20 WC, Aus Vs Pak: दुबई: ऑस्ट्रेलियाने T-20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. हा सामनाही न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासारखाच होता. जिथे शेवटच्या काही ओव्हरमध्ये संपूर्ण खेळ पलटला. पण कालच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या क्षणी एक कॅच सोडणं हे पाकिस्तानला खूपच महागात पडलं. 19 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या हसन अलीने जेव्हा मॅथ्यू वेडचा कॅच सोडला तेव्हाच सामना पाकिस्तानच्या हातून निसटला. कारण त्यानंतर वेडने सलग 3 सिक्स मारून सामनाच संपवून टाकला.

वास्तविक, ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदी गोलंदाजी करत होता. पहिल्या दोन बॉलमध्ये त्याने फक्त एकच रन दिला होता. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन बॅट्समनना मोठा फटका मारणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे स्ट्राईकवर असलेल्या मॅथ्यू वेडने मोठा फटका मारला देखील पण त्या फटक्यात एवढी ताकद नव्हती की तो सीमारेषेच्या पार जाईल.

अशावेळी सगळ्यांनाच वाटलं की, वेड कॅच आऊट होईल. कारण पाकिस्तानचा हसन अली हा कॅच पकडण्यासाठी धावला देखील होता. तो चेंडूपर्यंत पोहचला देखील पण शेवटच्या क्षणी त्याच्या हातून कॅच सुटला. जसा हा कॅच सुटला त्याच क्षणी पाकिस्तानच्या हातून फायनलचं तिकीटही निसटलं.

ऐन मोक्याच्या क्षणी हसन अलीकडून झेल सोडल्यानंतर तो प्रचंड हतबल झाला. पण तरीही सामना संपलेला नव्हता. त्यामुळे आपल्या संघातील खेळाडूने अशा प्रकारे हतबल होता कामा नये हे ओळखून शोएब मलिक तात्काळ त्याच्याजवळ धावत गेला आणि त्याचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करु लागला. पण त्यानंतर सलग तीनही चेंडूवर तीन सिक्स मारुन ऑस्ट्रेलियाने आरामात हा सामना जिंकला.

पुढच्या तीन चेंडूंवर मॅथ्यू वेडने सलग तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला थेट फायनलमध्येच पोहचवलं. मॅथ्यू वेडने केवळ 17 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह तब्बल 41 धावा केल्या. मॅथ्यू वेडची ही खेळी किती धमाकेदार होती याचा अंदाज आपल्याला यावरुन लावता येईल की, एका वेळी ऑस्ट्रेलियाला 24 चेंडूत 50 धावांची गरज होती. तरी देखील ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि तो सुद्धा 6 चेंडू शिल्लक ठेवून.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही या कॅच सोडल्याचा उल्लेख केला. हा कॅच सोडणं फारच महागात पडलं आणि तेच पराभवाचं महत्त्वाचं कारण आहे असंही त्याने सांगितलं. सामन्यानंतर बाबर आझमने सांगितले की, 'आम्ही पहिल्या हाफमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्यामुळे आम्ही चांगली धावसंख्या उभारली होती. पण गोलंदाजीदरम्यान आम्ही त्यांना अनेक संधी दिल्या ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवणं सोपं झालं.'

बाबर आझम पुढे म्हणाला की, 'आम्ही तो झेल पकडला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. कारण त्यावेळी नवीन फलंदाज क्रीझवर आला असता.' दरम्यान, बाबर आझमने अखेर आपल्या संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. 'आमचा संघ या स्पर्धेत ज्याप्रकारे खेळला ते खूपच शानदार आहे.'

pakistan vs australia t20 world cup semifinal match hasan ali drop matthew wade catch pak lost match
PakVsAus: पाकिस्तानच्या पराभवानंतर मिम्सचा महापूर; तुम्हालाही आवरणार नाही हसू

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या रोमहर्षक विजयामुळे आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळणार आहे. याच सामन्यात ठरणार आहे की, t-20 चा विश्वविजेता कोण ठरणार.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in