क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, दुर्घटनेत पंतला गंभीर दुखापत
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा भयंकर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रुडकीवरून परताना गुरुकुल नारसन परिसरात ऋषभ पंतची कार दुर्घटनाग्रस्त झाली. अपघाताचे काही फोटो समोर आले असून, ऋषभ पंतला गंभीर जखमा झालेल्या दिसत आहेत. (rishabh pant injured in car accident in delhi) 25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंत […]
ADVERTISEMENT

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा भयंकर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रुडकीवरून परताना गुरुकुल नारसन परिसरात ऋषभ पंतची कार दुर्घटनाग्रस्त झाली. अपघाताचे काही फोटो समोर आले असून, ऋषभ पंतला गंभीर जखमा झालेल्या दिसत आहेत. (rishabh pant injured in car accident in delhi)
25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंत सकाळी 5.15 वाजता दिल्लीवरून परत रुडकीला चालला होता. बीएमडब्ल्यू कारने जात असताना नारसन सीमेजवळ हा अपघात घडला. ऋषभ पंतची कार रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. कार वेगात असल्यानं भीषण अपघात घडला.
अपघात झाला त्यावेळी कारमध्ये ऋषभ पंत एकटाच होता. अपघातानंतर काच तोडून तो बाहेर पडला. कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे ऋषभवर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
पंतला सुट्टी, राहुलचं उपकर्णधार पद काढून निवड समितीने काय दिला मेसेज?