
Sachin Tendulkar on India Today Conclave 2023 : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर शुक्रवारी इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये चर्चेसाठी सहभागी झाला होता. यावेळी Sachinism and the idea of India या सेशनमध्ये सचिनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, वनडे वर्ल्ड कप आणि वनडे क्रिकेटचे भविष्य यासह मैदानावरील अनेक मजेदार किस्से सांगितले. या किस्स्यांची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगलीय. (sachin tendulkar exclusive interview in india today conclave 2023)
सचिन (Sachin Tendulkar) बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणार का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर त्याने ठोस उत्तर न देता विषय टाळला होता. मी वेगवान गोलंदाजी करू शकत नाही. एक वेळ असा होता ज्यावेळेस सौरव गांगुलीने विकेट काढले होते, त्यावेळेस तो 140 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. पण नंतर त्याला कमरेचा त्रास जाणवला. त्यामुळे मी 140 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करून शकत नाही, असे उत्तर देत त्याने विषय टाळला.
इंडिया कॉनक्लेवच्या या चर्चासत्रात सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) हरभजन सिंह म्हणजेच (Harbhajan Singh)भज्जीबद्दल मजेदार किस्सा सांगितला. मी हरभजनला पहिल्यांदा मोहालीत पाहिले होते. ही गोष्ट 90 ची आहे. प्रत्येक बॉल टाकल्यानंतर तो रनरअपवर न जाता माझ्याकडे यायचा. त्यावेळेस मी बॉलरला खेळताना डोक हलवायचो, ते पाहून त्याला वाटायचं मी त्याला बोलवतोय,असा मजेदार किस्सा त्यांने यावेळी सांगितला.
1990 ला इंग्लंडमध्ये सचिन (Sachin Tendulkar) 10 रनवर आऊट झाला होता. मला क्रिस लुईसने बोल्ड केले होते असे सचिन म्हणतो. 1992 ला ज्यावेळेस पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळलो होतो, त्यावेळेस इयान बॉथमने मला आऊट केले होते. त्यावेळेस इयान बॉथमचे सेलिब्रेशन पाहून मला दुख झाले होते. या चर्चेत सचिनना ज्या सामन्यातील विकेटबद्दल विचारल त्याची त्यांनी अचूक उत्तरे दिली.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान पीचचा वाद उफाळला होता. या वादावर सचिनने भाष्य केले आहे. टेस्ट क्रिकेट किती दिवसांचा होतो, यावर वाद झाला नाही पाहिजे,असे स्पष्ट मत त्याने मांडलेय. टी20, वनडे फलंदाजांसाठी आणि टेस्ट क्रिकेट गोलंदाजांसाठी बनवला पाहिजे. जर तुम्ही डेड पिच देत असाल तर बॉलर्ससाठी काहिच नाही आहे. शेवटी सामन्याची मजा खराब होते. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमधून मजा येतेय की नाही यावर फोकस केले पाहिजे, ना की तो किती दिवसांचा रंगतो यावर,असे सचिन म्हणालाय.
वनडे क्रिकेट बोरींग होत चालला आहे. जर तूम्ही 50 ओव्हर्सच्या सामन्यात दोन बॉल देता, तेव्हा तुम्ही रिव्हर्स स्विंग संपवून टाकता. आता तुम्ही 5 फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवता तेव्हा स्पिनर्सला अनेक समस्या होतात. त्याला व्यवस्थित गोलंदाजी करता येणार नाही. त्यामुळे वनडे क्रिकेट बोरींग झालाय, त्याला जिवंत करावा लागेल असे मत सचिन (Sachin Tendulkar) मांडतो.
वुमेन्स प्रिमियर लीग सुरू करण्याचा बीसीसीआयने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. बीसीसीआयने त्यांचे काम केले आहे, आता आपली जबाबदारी आपण त्यांना सपोर्ट केले पाहिजे. WPLमध्ये महिला खेळाडूंची फिल्डींग पाहून मी हैराण आहे. ही एक चांगली सुरूवात आहे, यांना आपण सपोर्ट केले पाहिजे, असे आवाहन त्याने अनेक क्रिकेट फॅन्सना केले आहे.