Ind vs NZ : शमीने रचला इतिहास, कोहलीचा दिग्गजांना धक्का, सामन्यात 11 मोठे विक्रम

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

India vs New Zealand, World Cup 2023 : The biggest target chased in Dharamshala
India vs New Zealand, World Cup 2023 : The biggest target chased in Dharamshala
social share
google news

India vs New Zealand, World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग 5वा विजय नोंदवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. टीम इंडियाने रविवारी (22 ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळला, ज्यात 4 विकेट राखून विजय मिळवला. (fast bowler Mohammed Shami and then chase master Virat Kohli were the heroes, who have broken many amazing records.)

या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यानंतर चेस मास्टर विराट कोहली हे सामन्याचे नायक ठरले. 5 विकेट्स घेऊन शमी सामनावीर ठरला, तर कोहलीने 95 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली. या सामन्यात 11 आश्चर्यकारक विक्रम झाले. जाणून घेऊया त्याबद्दल…

पहिला विक्रम म्हणजे विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड संघाला पॉवरप्लेमध्ये एकही बळी घेता न आल्याची ही पहिलीच वेळ आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरवलं. रोहित-गिलने 71 धावांची भागीदारी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्वात मोठ्या धावसंख्येच्या यशस्वी पाठलाग

दुसरा विक्रम धर्मशालेतील स्टेडियमवर सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याबद्दल… या सामन्यात किवी संघाने 274 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 48 षटकांत 6 गडी गमावून सामना जिंकला.

हे ही वाचा >> डेटिंग अ‍ॅपवर भेट, 3 दिवस कारमध्ये ठेवला मृतदेह; ‘त्या’ हत्येची Inside Story

धर्मशाला येथे 227 धावांचे सर्वात मोठे लक्ष्य पार केले गेले. जानेवारी 2013 मध्ये झालेल्या त्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाविरुद्ध 47.2 षटकात 3 विकेट्स गमावून या लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकला होता.

ADVERTISEMENT

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट घेणारा भारतीय

२ – मोहम्मद शमी
1 – कपिव देव
1 – व्यंकटेश प्रसाद
1 – रॉबिन सिंग
1 – आशिष नेहरा
1 – युवराज सिंग

ADVERTISEMENT

गिलचा ऐतिहासिक विक्रम, सर्वात जलद 2 हजार वनडे धावा (डावांमध्ये)

38 – शुभमन गिल
40 – हाशिम आमला
45 – झहीर अब्बास
45 – केविन पीटरसन
45 – बाबर आझम
45 – Rassie व्हॅन डर Dussen

एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या करणारा किवी फलंदाज

145* – टॉम लॅथम, ऑकलंड, 2022
140 – मिचेल ब्रेसवेल, हैदराबाद, 2023
138 – डेव्हॉन कॉनवे, इंदूर, 2023
130 – डॅरेल मिशेल, धर्मशाला, 2023
120 – नॅथन अॅस्टल, राजकोट, 1999

हे ही वाचा >> Manoj Jarange-Patil: ‘आता वळवळ करायची नाही.. डावच उधळलाय’, जरांगे संतापले!

विश्वचषकात भारताविरुद्ध शतक झळकावणारा डॅरेल मिशेल हा दुसरा किवी फलंदाज आहे. याआधी ग्लेन टर्नरने 1975 मँचेस्टर सामन्यात न्यूझीलंडकडून नाबाद 114 धावा केल्या होत्या.

विश्वचषकात शमीचा गोलंदाजीचा विक्रम

सामने : 12
विकेट्स : 36
सरासरी: 15.02
स्ट्राइक रेट: 17.6
इकॉनॉमी रेट: 5.09

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय

44 – झहीर खान
44 – जवागल श्रीनाथ
36 – मोहम्मद शमी
31 – अनिल कुंबळे
29 – जसप्रीत बुमराह
28 – कपिल देव

विश्वचषकात सर्वाधिक वेळा ४ विकेट घेणारा गोलंदाज

6 – मिचेल स्टार्क
5 – इम्रान ताहिर
5 – मोहम्मद शमी

हे ही वाचा >> मराठा समाजाच्या आरक्षणावर EWS चा तोडगा? सरकारच्या त्या जाहिरातीचा अर्थ काय?

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत शमीशिवाय कोणत्याही भारतीय गोलंदाजाला दोनदा 4 बळी घेता आलेले नाहीत.

विश्वचषकात सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारे खेळाडू

21 – सचिन तेंडुलकर
12 – कुमार संगकारा
12 – शाकिब अल हसन
12 – विराट कोहली

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम

58 – एबी डिव्हिलियर्स (2015)
56 – ख्रिस गेल (2019)
50* – रोहित शर्मा (2023)
48 – शाहिद आफ्रिदी (2002)
47 – मोहम्मद वसीम (2023)

कोहलीने सर्वाधिक एकदिवसीय धावांच्या बाबतीत जयसूर्याला मागे टाकले

18426 – सचिन तेंडुलकर
14234 – कुमार संगकारा
13704 – रिकी पाँटिंग
13437 – विराट कोहली
13430 – सनथ जयसूर्या

    follow whatsapp

    ADVERTISEMENT