टीम इंडियातून लवकर गायब झालेले हे ५ खेळाडू माहित आहेत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करायचं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. यासाठी भारतात प्रत्येक क्रिकेटपटू हा रणजी, आयपीएल संघात स्थान मिळतं का यासाठी प्रयत्नशील असतो. काही खेळाडूंना स्थानिक स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात संधी मिळतेही. अनेकदा काही खेळाडू आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत संघातलं आपलं स्थान पक्क करतात. मात्र काही खेळाडूंच्या पदरात अपयश येतं.

ADVERTISEMENT

अनेकांना ठराविक संधीनंतर मग पुन्हा भारतीय संघाची दारं उघडली जात नाहीत. आज आपण भारतीय संघाकडून केवळ एक सामना खेळून गायब झालेल्या खेळाडूंची माहिती घेणार आहोत.

५) फैज फजल – काही वर्षांपूर्वी स्थानिक क्रिकेट, देवधर ट्रॉफी आणि इंडिया A संघाकडून खेळताना फजलने आपली छाप पाडली होती. मुंबईविरुद्ध इराणी ट्रॉफीत खेळत असताना फैजने केलेल्या खेळीमुळे त्याने निवड समितीचं लक्षही वेधून घेतलं. या जोरावर त्याची झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत भारतीय संघात निवडही झाली. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचीही धडाक्यात सुरुवात करत फैज फजलने पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्युरी झळकावली. मात्र दुर्दैवाने हा त्याचा पहिला आणि शेवटचा सामना ठरला. सिनीअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात नवीन खेळाडूंनी संधी दिली आणि मग फजल संघाबाहेरच गेला.

हे वाचलं का?

४) श्रीनाथ अरविंद – कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळणारा श्रीनाथ अरविंद उमदा गोलंदाज…२००८-०९ मध्ये अरविंदने कर्नाटककडून खेळायला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर २०११ मध्ये अरविंदला आयपीएलमध्ये RCB ने संधी दिली. या सिझनमध्ये त्याने १४ सामन्यांत २१ विकेट्स घेत सर्वांना आश्चर्यचकीत केलं. याच वर्षी अरविंदची इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी संघात निवड झाली. परंतू दुखापतीमुळे त्याला स्थान गमवावं लागलं. यानंतर थेट २०१५ साली रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर श्रीनाथ अरविंदला दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-२० मालिकेत संधी मिळाली. मात्र या सामन्यात त्याची चांगलीच धुलाई झाली. ३.४ ओव्हरमध्ये ४४ रन्स देत अरविंदने एक विकेट घेतली. यानंतर अरविंदची एकदाही भारतीय संघात निवड झाली नाही.

३) शाहबाज नदीम – ३० वर्षीय शाहबाज नदीम हा डोमेस्टिक क्रिकेटमधला सर्वात अनुभवी स्पिनर म्हणून ओळखला जातो. झारखंडकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या नदीमने आयपीएलमध्ये दिल्ली, हैदराबादचं प्रतिनिधीत्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १६ वर्षांचा अनुभव असलेल्या नदीमच्या नावावर ४०० बळी जमा आहेत. भारतीय संघाकडून टी-२० मालिकेत खेळण्यासाठी नदीमची निवड झाली होती. परंतू प्लेइंग ११ मध्ये त्याला जागा मिळाली नाही. २०१९ मध्ये कुलदीप यादवच्या जागेवर नदीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅचमध्ये संधी मिळाली. या सामन्यात नदीमने दोन्ही इनिंगमध्ये ४ विकेट्स घेतल्या. परंतू यानंतर टीम इंडियाच्या निवड समितीने पुन्हा नदीमच्या नावाचा विचार केला नाही.

ADVERTISEMENT

२) राहुल चहर – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करणारा स्पिनर राहुल चहर नेहमी चर्चेत असतो. अनेकदा राहुलने मुंबई इंडियन्सला सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. २०१८-१९ मध्ये विजय हजारे आणि देवधर ट्रॉफीत केलेल्या आश्वासक कामगिरीनंतर निवड समितीचं त्याच्याकडे लक्ष गेलं. २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. तिसऱ्या टी-२० सामन्यात राहुल चहरला संधी मिळाली. या टी-२० सामन्यात राहुलने २७ रन्स देऊन १ विकेट घेतली. मात्र यानंतर पुन्हा राहुल चहरचा भारतीय संघासाठी विचार झाला नाही.

ADVERTISEMENT

१) मयांक मार्कंडे – आयपीएल २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना मयांकने सर्वांना चकीत केलं. आपल्या अनोख्या स्टाईलच्या जोरावर मयांकने या सिझनमध्ये अनेक मोठ्या बॅट्समनला आपल्या जाळ्यात अडकवलं. १४ सामन्यात १५ विकेट आणि त्यानंतर २०१८-१९ मध्ये पंजाबकडून खेळताना रणजी ट्रॉफीमधली उत्तम कामगिरी या जोरावर मयांकला २०१९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालं.

मात्र दुर्दैवाने मयांकला या सामन्यात आपली चमक दाखवता आली नाही. एकही विकेट न घेता मार्कंडेने या मॅचमध्ये ३१ रन्स दिल्या. यानंतर पुन्हा मार्कंडेचा भारतीय संघासाठी विचार झाला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT