६१ पदकं, २२ गोल्ड राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाचा संपूर्ण प्रवास एका क्लिकवरती
स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत जरीन राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. आज समारोप समारंभ होणार आहे. राष्ट्रकुल २०२२ मध्ये पदकांच्या बाबतीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारताने एकूण ६१ पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी २२ सुवर्ण पदके, १६ रौप्य पदके आणि २३ कांस्य पदकं जिंकली आहेत. भारतीय वेळेनुसार […]
ADVERTISEMENT

स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत जरीन राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. आज समारोप समारंभ होणार आहे. राष्ट्रकुल २०२२ मध्ये पदकांच्या बाबतीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारताने एकूण ६१ पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी २२ सुवर्ण पदके, १६ रौप्य पदके आणि २३ कांस्य पदकं जिंकली आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता समारोप सोहळा सुरू होणार आहेत.
चाळीस वर्षीय शरथने चमकदार कामगिरी करत एकूण चार पदके जिंकली. त्याने पुरुष सांघिक आणि मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदक आणि पुरुष दुहेरीत रौप्य पदक जिंकले. त्याने पुरुष एकेरीमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, जरीनने महिलांच्या 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे कार्यवाहक अध्यक्ष अनिल खन्ना यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “अचंता शरथ कमल आणि निखत जरीन हे आमचे ध्वजवाहक असतील हे सांगताना मला खूप आनंद होत आहे.
ते म्हणाला, शरथने टेबल टेनिसमध्ये एवढ्या वर्षात मोठी सेवा केली असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतले पदक हे त्याचा पुरावा आहे. त्याचबरोबर जरीन सध्याची जगज्जेती आणि सुवर्णपदक विजेती आहे. तिने भारतातील अनेकांना, विशेषतः तरुण मुलींना प्रेरणा दिली आहे.