Ind Vs Aus ODI series : टेस्टनंतर ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेतही झटका

मुंबई तक

Ind Vs Aus 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली असून आता वनडे मालिका होणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (Steve Smith) स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. पॅट कमिन्स (Pat cummins) भारतात परतणार नसल्याची पुष्टी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ind Vs Aus 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली असून आता वनडे मालिका होणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (Steve Smith) स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. पॅट कमिन्स (Pat cummins) भारतात परतणार नसल्याची पुष्टी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. (After the Test, Australia suffered a setback in the ODI series as well)

कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपली आई मारियाची काळजी घेण्यासाठी दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर दौरा सोडला. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळला जात असताना त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, ‘पॅट परत येणार नाही, आमची सहानुभूती पॅट आणि त्याच्या कुटुंबासोबत आहे. तो कठीण परिस्थितीतून जात आहे.

याचाच अर्थ मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केल्यानंतर स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेत कर्णधार म्हणून कायम राहील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला, ज्यामुळे टीम इंडियाने मालिका २-१ ने जिंकली. इंदूरमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील एक सामना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.

पॅट कमिन्सने गेल्या वर्षी अॅरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय क्रिकेटची कमान हाती घेतली होती, परंतु त्याने आतापर्यंत केवळ दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. शुक्रवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेचे महत्त्व वाढले आहे कारण या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक याच देशात खेळवला जाणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp