Video : W,W,W,W,W,W,W,W,W...सचिनच्या लेकाची कमाल, एकाच सामन्यात घेतल्या 9 विकेट
Arjun Tendulkar 9 Wicket Video : गोवा क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना अर्जुन तेडुलकरने सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने 5 तर दुसऱ्या डावात अर्जुनने 4 विकेट घेतले. त्यामुळे या रेड बॉल स्पर्धेत अर्जुनने शानदार गोलंदाजी करत गोव्याला एक डाव आणि 189 धावांनी विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सचिनच्या लेकाने मैदान गाजवलं
एकाच सामन्यात घेतल्या 9 विकेट
गोवाच्या विजयात बजावली मोलाची भूमिका
Arjun Tendulkar 9 Wicket Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकराच्या लेकाने मोठा पराक्रम केला आहे. अर्जुन तेडुलकरने एकाच सामन्यात तब्बल 9 विकेट घेतल्या आहेत. डॉक्टर के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली आहे. अर्जुनच्या या भेदक गोलंदाजीमुळे गोव्याने एक डाव 189 धावांनी कर्नाटक संघावर विजय मिळवला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात अर्जुन तेंडुलकराची चर्चा सुरू झाली आहे. (arjun tendulkar get 9 wicket against karnatak for goa cricket association k thimmappiah memorial)
ADVERTISEMENT
गोवा क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना अर्जुन तेडुलकरने सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने 5 तर दुसऱ्या डावात अर्जुनने 4 विकेट घेतले. त्यामुळे या रेड बॉल स्पर्धेत अर्जुनने शानदार गोलंदाजी करत गोव्याला एक डाव आणि 189 धावांनी विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज! 'त्या' महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार पैसे
अर्जुन तेंडुलकरने केएससीए इलेव्हनच्या फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात केवळ 41 धावा देत 5 विकेट्स घेतले. अर्जुन तेंडुलकरने केएससीए इलेव्हनच्या पहिल्या पाचपैकी चार फलंदाजांना बाद केले आणि त्यानंतर अक्षन रावची विकेट घेत 5 विकेटचा टप्पा पूर्ण केला. केएससीए इलेव्हन संघाला पहिल्या डावात केवळ 103 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गोवा क्रिकेट असोसिएशन संघाने पहिल्या डावात 413 धावांची मोठी मजल मारली. अभिनव तेजरानाने 109 धावांची खेळी केली. मंथन खुटकरने 69 धावांची खेळी केली तर अर्जुन तेंडुलकरने18 धावांचे योगदान दिले.
हे वाचलं का?
दुसऱ्या डावात अर्जुन तेंडुलकरने पुन्हा आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी खेळाडूने गुढघे टेकायला भाग पाडले. यावेळी केएससीए इलेव्हन संघ अवघ्या 121 धावांत गारद झाला आणि यावेळीही अर्जुनने मोलाची भूमिका बजावली.अर्जुनने दुसऱ्या डावात 55 धावांत 4 विकेट घेतले. यासह अर्जुनने एकूण 9 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यामुळे आता अर्जुनच्या कामगिरीचे क्रिकेट वर्तुळात कौतुक होत आहे.
हे ही वाचा : Eknath Shinde : विधानसभेआधी महामंडळांचं वाटप! शिंदेंच्या 3 नेत्यांना मंत्रीपदाचा दर्जा, पवारांचा एकही नेता नाही?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT