Ind vs SL 2021 : Corona चा फटका, श्रीलंका दौऱ्याचं नवीन वेळापत्रक जाहीर
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला कोरोनाचा फटका बसला आहे. १३ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार होती. परंतू श्रीलंकेच्या संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. १८ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार […]
ADVERTISEMENT
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला कोरोनाचा फटका बसला आहे. १३ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार होती. परंतू श्रीलंकेच्या संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. १८ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हे सर्व सामने कोलंबोच्या मैदानावर खेळवले जातील. सध्याची परिस्थिती खडतर आहे याचा आम्हाला अंदाज आहे. परंतू दा दौरा व्यवस्थित पार पाडण्यासाठी आम्ही श्रीलंकन बोर्डाच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रीया बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली.
SL vs Ind 2021 : भारताच्या दौऱ्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला होणार मोठा आर्थिक फायदा
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अॅशले डी-सिल्वा यांनी या काळात मदत केल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
असं असेल भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक –
ADVERTISEMENT
-
पहिली वन-डे : १८ जुलै
ADVERTISEMENT
दुसरी वन-डे : २० जुलै
तिसरी वन-डे : २३ जुलै
-
पहिली टी-२० : २५ जुलै
-
दुसरी टी-२० : २७ जुलै
-
तिसरी टी-२० : २९ जुलै
ADVERTISEMENT