Omicron ची भीती, BCCI ने रणजी ट्रॉफी स्पर्धा पुढे ढकलली
नवीन वर्षात देशभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असताना सरकारी यंत्रणांनी निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. या ओमिक्रॉनचा फटका आता क्रिकेटलाही बसला आहे. नवीन वर्षातला रणजी क्रिकेट स्पर्धेचा हंगाम, सी.के.नायडू ट्रॉफी आणि महिलांची टी-२० स्पर्धा बीसीसीआयने पुढे ढकलली आहे. रणजी करंडक आणि सी.के.नायडू ट्रॉफी स्पर्धा या महिन्यात सुरु होणार होती तर महिलांची टी-२० स्पर्धा फेब्रुवारीत सुरु […]
ADVERTISEMENT
नवीन वर्षात देशभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असताना सरकारी यंत्रणांनी निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. या ओमिक्रॉनचा फटका आता क्रिकेटलाही बसला आहे. नवीन वर्षातला रणजी क्रिकेट स्पर्धेचा हंगाम, सी.के.नायडू ट्रॉफी आणि महिलांची टी-२० स्पर्धा बीसीसीआयने पुढे ढकलली आहे.
ADVERTISEMENT
रणजी करंडक आणि सी.के.नायडू ट्रॉफी स्पर्धा या महिन्यात सुरु होणार होती तर महिलांची टी-२० स्पर्धा फेब्रुवारीत सुरु होणार होती. परंतू देशभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, सामनाधिकारी आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांची तब्येत चांगली राखणं ही आमची जबाबादारी असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
मुंबईच्या रणजी संघाची घोषणा, पृथ्वी शॉ कडे नेतृत्व; अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान
हे वाचलं का?
त्यामुळे यापुढे देशात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय सर्व राज्य संघटनांशी समन्वय साधून पुढील सामन्यांबद्दलचा निर्णय घेणार आहे. यंदाच्या हंगामात सय्यद मुश्ताक अली टी-२० आणि विजय हजारे वन-डे स्पर्धा झाल्यानंतर कोरोनाने पुन्हा एकदा क्रिकेटला ब्रेक लावला आहे.
SA vs IND : जोहान्सबर्ग कसोटी दोलायमान स्थितीत, दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे ५८ धावांची आघाडी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT