Asia cup 2022 : टीम इंडियाला मोठा झटका; रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर

मुंबई तक

यूएईमध्ये आशिया चषक खेळणाऱ्या टीम इंडियाला स्पर्धेच्या मध्यातच मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बॅटने शानदार खेळ दाखवत 35 धावांची इनिंग खेळली होती. जडेजाच्या जागी अक्षर पटेल खेळणार भारतीय निवड समितीने सध्या सुरू असलेल्या आशिया […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

यूएईमध्ये आशिया चषक खेळणाऱ्या टीम इंडियाला स्पर्धेच्या मध्यातच मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बॅटने शानदार खेळ दाखवत 35 धावांची इनिंग खेळली होती.

जडेजाच्या जागी अक्षर पटेल खेळणार

भारतीय निवड समितीने सध्या सुरू असलेल्या आशिया चषकासाठी रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड केली आहे,” असे बीसीसीआयने म्हटले आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याची जागा घेणारा अक्षर पटेल ज्याला याआधी संघात स्टँडबाय म्हणून स्थान देण्यात आले होते, तो लवकरच दुबईला संघात सामील होणार आहे.

चांगल्या फॉर्ममध्ये होता जडेजा

IPL 2022 मध्ये देखील रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला काही सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर जडेजाने इंग्लंड दौऱ्यातून मैदानात पुनरागमन केले. तेव्हापासून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आता त्याची एक्झिट हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अक्षरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

रवींद्र जडेजाच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अक्षर पटेलकडून भारतीय चाहत्यांना आता चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱ्यावरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अक्षरने नाबाद 64 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्या सामन्यात 311 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 80 धावांच्या आत तीन विकेट गमावल्या होत्या.मात्र श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या शानदार फलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला. अक्षरने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही प्रभावी कामगिरी करत मालिकेत एकूण सात विकेट्स घेतल्या होत्या.

भारत सुपर फोरमध्ये पोहोचला आहे

टीम इंडिया आधीच आशिया कप 2022 च्या सुपर फोरमध्ये पोहोचली आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात त्यांनी हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. आता भारतीय संघ 4 सप्टेंबरला पाकिस्तान/ हाँगकाँगशी भिडणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp