umesh yadav: क्रिकेटपटू उमेशचे लाखो रुपये हडपले, शैलेश ठाकरेविरुद्ध गुन्हा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagpur crime news : भारतीय संघातील जलदगती गोलंदाज उमेश यादवचे (Ace Indian pacer umesh Yadav) त्याच्याच मॅनेजरने लाखो रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. उमेश यादवच्या खात्यातील पैसे परस्पर काढून मॅनेजर शैलेश ठाकरेने (Shailesh Thackeray) स्वतःच्या नावे संपत्ती खरेदी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) मिळालेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा (Fraud case) दाखल केला आहे. (cricketer Umesh Yadav was duped of Rs 44 lakh by his friend turned manager Shailesh Thackeray)

गोलंदाज उमेश यादवची एकेकाळी मित्र आणि आता मॅनेजर असलेल्या व्यक्तीने फसवणूक केलीये. उमेश यादवने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेची नागपूरमध्ये चांगलीच चर्चा रंगलीये. सध्या पोलीस उमेश यादवच्या मॅनेजरचा शोध घेताहेत.

उमेश यादवची फसवणूक : नेमकं प्रकरण काय?

उमेश यादवला भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यापासून देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावं लागतं. त्यामुळे उमेश यादवने त्याचा मित्र असलेला आरोपी शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँक व इतर व्यवहाराकरिता पगारी मॅनेजर म्हणून ठेवून घेतलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मॅनेजर म्हणून काम करत असताना आरोपीनं उमेश यादवची कोणतीही कामं केली नाही. तसेच उमेश यादवने मॅनेजर शैलेश ठाकरेला प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी त्याचे पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील एमएसईबी कॉलनी येथील स्टेट बँक शाखेतील खात्यात एकूण 44 लाख रुपये ठेवले होते.

शैलेश ठाकरेने त्या 44 लाख रुपयातून उमेश यादवसाठी प्रॉपर्टी खरेदीच केली नाही. शैलेश ठाकरे याने बँक खात्यातून परस्पर पैसे काढून स्वतःच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली. नंतर उमेश यादवला पैसेही परत दिले नाही. शैलेश ठाकरेंने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर उमेश यादवने पोलिसांत धाव घेतली.

ADVERTISEMENT

उमेश यादवने कोराडी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शैलेश ठाकरेविरुद्ध भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपी शैलेश ठाकरेचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT