Maharashtra Kesari: शिवराज राक्षे ठरला डबल महाराष्ट्र केसरी, जिंकली ‘ही’ गाडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

dharashiv shivraj rakshe wins maharashtra kesari for second time wins silver mace and scorpio car
dharashiv shivraj rakshe wins maharashtra kesari for second time wins silver mace and scorpio car
social share
google news

Maharashtra Kesari: गणेश जाधव, धाराशिव: 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महाराष्ट्र केसरी किताब हा कुस्तीपटू शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe)पटकवला आहे. सलग दुसऱ्यांदा शिवराजने महाराष्ट्र केसरी किताब पटकावण्याची किमया यावेळी केली आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी हर्षवर्धन सदगीर (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे (गादी गट) या दोघात अंतिम कडवी लढत झाली. हर्षवर्धन सदगीर कुस्तीच्या वेळी 1.42 मिनिटांचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागल्याने जखमी झालेला. पण नंतर तो त्याच जोशाने मैदानात उतरला. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा मानकरी ठरला. तो पुण्यातील असून नांदेडकडून प्रतिनिधित्व करतो. (dharashiv shivraj rakshe wins maharashtra kesari for second time wins silver mace and scorpio car)

धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य के. टी. पाटील क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली.आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला.

माती गटातून गणेश जगताप 2 गुण व हर्षवर्धन सदगीर 6 गुण अशी लढत होऊन हर्षवर्धन विजयी झाला तर गादी गटात कुस्ती ही शिवराज राक्षे 10 गुण व पृथ्वीराज मोहोळ 0 अशी एकतर्फी झाली. त्यात राक्षे विजयी झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> World Cup हरल्यानंतर गीतेतील ‘तो’ श्लोक प्रचंड व्हायरल, कृष्ण म्हणतो…

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, धाराशिव तालीम संघ. व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजन केले होते. सुधीर पाटील, अभिराम पाटील व आदित्य पाटील यांनी यात मोलाची भूमिका बजावली.

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरीमध्ये सिकंदर शेख ठरलेला विजयी

काही दिवसांपूर्वीच पुण्यातही महाराष्ट्र केसरीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये सिकंदर शेखने बाजी मारली होती. पुण्यातील या स्पर्धेत सिकंदर शेखने अवघ्या 30 सेकंदात प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> संजय राऊतांकडून ‘कसिनो’तला फोटो ट्वीट, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

दरम्यान, सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. सिकंदर शेखचा फोटो पोस्ट करत ‘अभिनंदन महाराष्ट्र केसरी 2023’ असे कॅप्शन देत मुरलीधर मोहोळ यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. अखेर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा सिकंदर शेखच्या खांद्यावर. सिकंदर शेखचे मन:पूर्वक अभिनंदन, असे आशयाचे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT