दिनेश कार्तिकने एका रात्रीतच मोडले एमएस धोनीचे दोन विक्रम
राजकोट येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या T-20 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव केला. यासह, 5 टी-20 सामन्यांची मालिका आता 2-2 अशी रोमहर्षक झाली आहे. चौथ्या T-20 मध्ये भारताच्या विजयाचा नायक ठरला तो दिनेश कार्तिक, ज्याने 27 चेंडूत 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सामना जिंकूण देणारी खेळी खेळली. त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांसह […]
ADVERTISEMENT
राजकोट येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या T-20 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव केला. यासह, 5 टी-20 सामन्यांची मालिका आता 2-2 अशी रोमहर्षक झाली आहे. चौथ्या T-20 मध्ये भारताच्या विजयाचा नायक ठरला तो दिनेश कार्तिक, ज्याने 27 चेंडूत 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सामना जिंकूण देणारी खेळी खेळली. त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावा ठोकल्या. प्रथम, त्याने आपल्या 16 वर्षांच्या T-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आणि दुसरा म्हणजे एमएस धोनीचा (MS Dhoni) मोठा विक्रम मोडला.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) हा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे. या प्रकरणात त्याने एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे. दिनेश कार्तिकने राजकोटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फिफ्टी प्लस स्कोअर केला तेव्हा त्याचे वय 37 वर्षे 16 दिवस होते.
एमएस धोनीने 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धही हा अद्भुत पराक्रम केला होता. तेव्हा त्यांचे वय 36 वर्षे 229 दिवस होते. T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पन्नास प्लस धावांच्या व्यतिरिक्त, कार्तिकने आणखी एका प्रकरणात त्याचा विक्रम मोडला आहे. तो आता भारतासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. हा विक्रम धोनीच्या नावावर होता, त्याने 52 धावा केल्या होत्या.
हे वाचलं का?
जागतिक क्रिकेटमध्ये 50 प्लस धावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू लक्समबर्गच्या टोनी व्हिटमनच्या नावावर आहे. टोनी यांचे त्यावेळी वय होते 52 वर्षे आणि 101 दिवस. त्याच वेळी, पूर्ण सदस्य संघातील हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 41 वर्षे आणि 294 दिवसांत वेस्ट इंडिजसाठी पन्नास प्लस धावा केल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT