टी-20 विश्वचषक संघाच्या निवडीवरती नाराजी उघड, माजी कर्णधारानं सुचवले बदल
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिग्गजांना बाहेर ठेवत संघात नवोदितांना संधी देण्यात आली आहे. संघावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यावर नाराज आहे. मोहम्मद अझरुद्दीनने श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्याची मागणी केली आहे. मोहम्मद अझरुद्दीनने सुचवले दोन बदल बीसीसीआयनं सोमवारी टी-20 […]
ADVERTISEMENT
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिग्गजांना बाहेर ठेवत संघात नवोदितांना संधी देण्यात आली आहे. संघावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यावर नाराज आहे. मोहम्मद अझरुद्दीनने श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
मोहम्मद अझरुद्दीनने सुचवले दोन बदल
बीसीसीआयनं सोमवारी टी-20 विश्वचषक संघाची घोषणा केली, त्यानंतर अझरुद्दीनने ट्विट केले. त्याने लिहिले की, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीला मुख्य संघातून वगळलेले पाहून धक्का बसला. श्रेयस अय्यरच्या जागी दीपक हुड्डा आणि हर्षल पटेलच्या जागी मोहम्मद शमीला खेळायला हवे होते असा सल्लाही अझरुद्दीनने दिला आहे. ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. स्पर्धेला16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे तर अंतिम सामना 13 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
संघाबद्दल बोलायचे झाले तर मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर यांचा स्टँडबाय खेळाडू संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू 2021 च्या T-20 विश्वचषकात संघाचा भाग होते, पण तेव्हापासून ते टी-20 संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहेत. टी-20 विश्वचषकानंतर मोहम्मद शमीने एकही टी-20 सामना खेळलेला नाही. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियाच्या टी-20 मध्ये स्थान मिळवले आहे. दुखापतीमुळे तो आशिया चषक खेळू शकला नाही, पण एकदा तो तंदुरुस्त झाल्यावर टी-20 विश्वचषक संघात स्थान निश्चित करेल, असे मानले जात होते.
हे वाचलं का?
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (WK), दिनेश कार्तिक (WK), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ADVERTISEMENT
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचे संपूर्ण वेळापत्रक
• 17 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सराव सामना) सकाळी 9.30 वाजता
ADVERTISEMENT
• 19 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना) दुपारी 1.30 वाजता
• 23 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1.30 वाजता
• 27 ऑक्टोबर – भारत वि A2, दुपारी 12:30
• 30 ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुपारी 4.30
• 2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश, दुपारी 1.30
• 6 नोव्हेंबर – भारत विरुद्ध B1, दुपारी 1.30
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT