चेन्नई टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव, इंग्लंड २२७ रन्सने विजयी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवीन वर्षात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर २२७ रन्सनी मात करत ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. ४२० रन्सचं टार्गेट मिळालेल्या भारतीय बॅट्समननी दुसऱ्या इनिंगमध्ये हाराकिरी करुन आपल्या विकेट फेकल्या. बॉलर्सना मदत करणाऱ्या चेपॉकच्या पिचचा इंग्लंडच्या बॉलर्सने पुरेपूर फायदा घेतला. भारताकडून विराट कोहली आणि शुबमन गिल यांचा अपवाद वगळता एकही बॅट्समन इंग्लंडचा सामना करु शकला नाही.

ADVERTISEMENT

चौथ्या दिवसाच्या अखेरीस रोहित शर्माच्या रुपाने टीम इंडियाने एक विकेट गमावली होती. चेन्नईच्या पिचवर बॉल अनपेक्षितरित्या बाऊन्स होऊन येत असल्यामुळे अखेरच्या दिवशी भारतीय बॅट्समनची खरी परीक्षा होती. पण दुर्देवाने भारतीय खेळाडू या परीक्षेत नापास झाले.

चेतेश्वर पुजाराला आऊट करत जॅक लिचने भारताला अखेरच्या दिवशी पहिला धक्का दिला. यानंतर कोहली आणि गिल यांनी छोटेखानी पार्टनरशीप करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शुबमन गिलने आपलं अर्धशतकही साजरं केलं. पण यानंतर जेम्स अँडरसनने एकाच ओव्हरमध्ये गिल आणि रहाणेची दांडी गुल करत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं. यानंतर भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. विराट कोहलीने एका बाजूने तग धरत अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला झुंज दिली. बेन स्टोक्सने विराटला क्लिन बोल्ड करत टीम इंडियाच्या उरल्या सुरल्या आशाही संपवल्या. ७२ रन्स काढून विराट आऊट झाला. यानंतर भारताच्या उर्वरित बॅट्समनला झटपट आऊट करत इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT