”विराट कोहलीवर जळतो गौतम गंभीर म्हणून…’, ‘त्या’ वादावर क्रिकेटरचं मोठं विधान
आयपीएल 2023 सीझनमध्ये विराट कोहली (Virat Kohli), नवीन उल हक (naveen ul haq) आणि गौतम गंभीर (gautam gambhir) यांच्यात तुफान राडा झाला होता. या आयपीएलमधील वादावर आता पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजादने खळबळजनक विधान केले आहे.
ADVERTISEMENT
आयपीएल म्हटलं की राडा आलाच, प्रत्येक सीझनमध्ये नवीन राडा असतोच, यंदाच्या आयपीएल 2023 सीझनमध्ये विराट कोहली (Virat Kohli), नवीन उल हक (naveen ul haq) आणि गौतम गंभीर (gautam gambhir) यांच्यात तुफान राडा झाला होता. या आयपीएलमधील वादावर आता पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजादने खळबळजनक विधान केले आहे. गौतम गंभीर विराट कोहलीवर जळत असल्याने त्याने तसे कृत केल्याचे विधान अहमद शहजादने केले आहे. या विधानाची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. (gautam gambhir fought with virat kohli out jealousy naveen ul haq pakistani cricketer ahmed shehzad)
ADVERTISEMENT
नादिर अलीच्या पॉडकास्टवर अहमद शहजाद बोलत होता. या वादावर बोलताना अहमद शहजाद म्हणाला, एक प्रेक्षक किंवा क्रिडाप्रेमी म्हणून, माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. गौतम गंभीर (विराट कोहलीवर) जळत असल्याने त्याने असे कृत्य केले आहे. तसेच विराटसोबत त्याचा वाद व्हावा यासाठी तो काहीतरी घडण्याची वाट पाहत असल्याचा आरोप देखील अहमद शहजादने गंभीरवर केला आहे. तसेच मी कधीही टीम मॅनेजमेंटच्या सदस्याला अशाप्रकारे भांडताना पाहिले नाही आहे, असे देखील तो म्हणाला आहे.
हे ही वाचा : ICC Test Ranking : टॉप 10 सोडाच! टेस्ट रॅकींगमध्ये विराट कोहलीने गमावलं स्थान
ही संपूर्ण घटना पाहणे खूपच दुख:द होतं. कारण मी समजू शकतो, कोहलीची अफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकशी भांडण झाले, कारण मैदानावर अशा गोष्टी होत असतात असे अहमद शहजाद म्हणाला आहे. पण गौतम गंभीरने आपल्या देशातील सर्वात मोठ्या खेळाडूला अशी वागणूक का दिली?हे मला समजले नाही,असे देखील अहमद शहजाद म्हणाला आहे.
हे वाचलं का?
मैदानात राडा कसा सुरु झाला…
लखनऊचा (Lucknow Super Jaints) 18 धावांनी पराभव केल्यानंतर आरसीबीने जल्लोष केला होता. या जल्लोषानंतर अनेक प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांशी संवाद साधत आहे. सामन्या दरम्यानच खुपच गरमागरमी झाली होती.यावरच खेळाडूंमध्ये चर्चा सुरु होती.
सामना संपल्यानंतर मेयर्स आणि विराट कोहली एकत्र चालत होते. या दरम्यान मेयर्सने कोहलीला विचारले की, तो सामन्या दरम्यान सतत अपशब्द का वापरत होता. यावर तो माझ्याकडे पाहत होता? असे उत्तर विराटने दिले. याआधी अमित मिश्राने अंपायर्सकडे विराट कोहली नवीन उल हकला (Naveen ul haw) शिवीगाळ करत असल्याची तक्रार दिली होती. या दरम्यान मेयर्स आणि विराटमध्ये चर्चा सुरु असताना,गौतम गंभीरने मेयर्सला ओढत त्याला विराटशी न बोलण्याचा सल्ला दिला. या दरम्यानच विराटने काही तरी टिपण्णी केली आणि वादाता तोंड फुटले होते. यानंतर गौतम आणि विराटमध्ये शाब्दीक युद्ध ऱंगले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘…तर भारतात वर्ल्डकपही खेळणार नाही’, जावेद मियादादने बीसीसीआयला डिवचलं
गौतम-विराटमधला शाब्दीक वाद?
गौतम गंभीर : काय बोलायचंय बोल?
विराट कोहली : मी तुम्हाला काही बोललोच नाही, तुम्ही का मध्ये घुसताय?
गौतम गंभीर : तु जर माझ्या खेळाडूला काही बोलला आहेस, म्हणजे तु माझ्या कुटुंबातील व्यक्तीला शिविगाळ केली आहेस.
विराट कोहली : मग तुम्ही तूमच्या कुटूंबाला सांभाळून ठेवा.
गौतम गंभीर : (दोघांना एकमेकांपासून दुर करत असताना गौतमने उत्तर दिले) मग तू आता मला शिकवणार का? असा सवाल गंभीरने केला.
ADVERTISEMENT
दरम्यान असं हायव्होल्टेज संभाषण या खेळाडूंमध्ये झाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT