Ind vs Aus: गिल, सूर्या फ्लॉप, भारताचा दारुण पराभव; कोण आहे मॅचचा दोषी?
Ind vs aus 2nd One day : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विशाखापट्टणम वनडेत टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई वनडेत चिवट विजयानंतर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत पराभव पत्करावा लागला आणि यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. हा पराभव भारतीयांना स्मरणात राहणार आहे कारण हा भारताचा एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे, जो घरच्या मैदानावर झाला आहे. […]
ADVERTISEMENT
Ind vs aus 2nd One day : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विशाखापट्टणम वनडेत टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई वनडेत चिवट विजयानंतर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत पराभव पत्करावा लागला आणि यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. हा पराभव भारतीयांना स्मरणात राहणार आहे कारण हा भारताचा एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे, जो घरच्या मैदानावर झाला आहे. (Gill, Surya flop, India’s crushing defeat; Who is the culprit of the match?)
ADVERTISEMENT
विशाखापट्टणममध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ 117 धावा केल्या. टीम इंडिया अवघ्या 26 षटकांत गडगडली, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवला आणि सामना 234 चेंडू शिल्लक असताना संपला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडू शिल्लक असताना भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे.
Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ क्रिकेटर भारताचा जावई
हे वाचलं का?
या पराभवाचा दोषी कोण?
शुभमन गिल– दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिलला पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 20 धावा करता आल्या, तर दुसऱ्या वनडेत त्याला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे, पण शुभमनला ते टीम इंडियाला मिळवून देता आले नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमनची विकेट पडल्यानंतरच टीम इंडियाच्या विकेट्सना गळती लागली.
सूर्यकुमार यादव: टी-20 सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादव वनडेत खराब फॉर्मशी झगडत आहे. ही मालिका त्याच्यासाठी आतापर्यंत विस्मरणीय ठरली आहे. सूर्यकुमार यादव सलग दोन सामन्यांमध्ये गोल्डन डकचा बळी ठरला आहे, म्हणजेच तो डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सूर्या सतत फ्लॉप ठरत आहे, अशा परिस्थितीत त्याच्या जागी दुस-याला संधी मिळावी, अशी मागणी होत आहे.
ADVERTISEMENT
Ind vs Aus : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टाईल विजय
ADVERTISEMENT
मिडल ऑर्डर फ्लॉप : भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली नाही, पण मिडल ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली. सूर्यापाठोपाठ हार्दिक पांड्या, केएल राहुललाही धावा करता आल्या नाहीत. सूर्यकुमार यादव 0, हार्दिक पांड्या 1 आणि केएल राहुल केवळ 9 धावा करू शकले. अवघ्या 5 षटकांत तिघेही बाद झाले आणि त्यानंतर भारताची धावसंख्या 49/5 झाली.
गोलंदाजही खराब ठरले : भारतीय फलंदाजांनी केवळ 117 धावा केल्या होत्या, त्यामुळे गोलंदाजांकडून अधिक अपेक्षा करणे कठीण होते. पण ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे हे लक्ष्य 11 षटकांत गाठले ते अधिक क्लेशदायक ठरले. या सामन्यात सिराजने 3 षटकात 37 धावा, हार्दिकने 1 षटकात 18 धावा, कुलदीप यादवने 1 षटकात 12 धावा दिल्या.
विशाखापट्टणम One Day स्कोरकार्ड
• भारत – 117/10, 26 षटके
• ऑस्ट्रेलिया – 121/0, 11 षटके
भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव (चेंडू शिल्लक ठेऊन)
• 234 चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2023
• 212 चेंडू वि. न्यूझीलंड, 2019
• 209 चेंडू श्रीलंका, 2010
Ind vs Aus 2nd ODI : स्टीव्ह स्मिथने अद्भुत कॅच पकडला; हार्दिक पांड्या बघतच राहिला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT