वादग्रस्त Umpire’s Call चा नियम कायम राहणार, DRS च्या नियमांमध्ये महत्वाचे बदल

मुंबई तक

टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये LBW आणि DRS च्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. LBW च्या निर्णयाविरोधात खेळाडूंना DRS प्रणालीच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरकडे दाद मागण्याची मुभा असते. परंतू अनेकदा रिव्ह्यूमध्ये Umpire’s Call या पर्यायामुळे फलंदाजांना जिवदान मिळतं. हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता, अनेक माजी खेळाडूंनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये LBW आणि DRS च्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. LBW च्या निर्णयाविरोधात खेळाडूंना DRS प्रणालीच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरकडे दाद मागण्याची मुभा असते. परंतू अनेकदा रिव्ह्यूमध्ये Umpire’s Call या पर्यायामुळे फलंदाजांना जिवदान मिळतं. हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता, अनेक माजी खेळाडूंनी या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. परंतू कुंबळे याच्या अध्यक्षतेखालील समितीने अंपायर्स कॉलचा वादग्रस्त निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने यामध्ये काही महत्वाचे बदलही केले आहेत.

पहिला बदल – LBW च्या रिव्ह्यूसाठी तिसऱ्या अंपायरकडे दाद मागितल्यानंतर पूर्वी समजा बॉल हा बेल्स अर्धवट लागत असेल तर अंपायर्स कॉलनुसार…मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला जायचा. ज्याला अनेकांचा आक्षेप होता…म्हणजे बॉल बेल्सला लागत असल्याचं स्पष्ट दिसत असतानाही केवळ मैदानातील अंपायर्सनी बॅट्समनला नॉट आऊट ठरवलं म्हणून त्याला जिवदान मिळणं ही गोष्ट अनेकांना खटकली होती.

आता या नियमांमध्ये महत्वाचा बदल करण्यात आला असून विकेट झोनची उंची ही वाढवण्यात आली आहे. याचाच अर्थ आता थर्ड अंपायर निर्णय देताना स्टम्पच्या उंचीचा विचार न करता बेल्सच्या उंचीचा विचार करेल. याआधी बेल्सच्या खालच्या भागाची उंची ही ग्राह्य धरली जायची.

IPL 2021 Explainer : ऋषभकडे दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन्सी, निर्णय किती बरोबर किती चूक?

दुसरा बदल – अनेकदा बॉलर LBW चं अपील फेटाळल्यानंतर फारसा विचार न करात DRS चा निर्णय घेतात…आणि अनेकदा त्यांचे अंदाज चुकतात. पण नवीन बदलांनुसार आता प्लेअर मैदानावरील अंपायर्सना बॅट्समनने बॉल खेळण्याचा प्रयत्न केला आहे की नाही हे विचारु शकतात.

याचसोबत थर्ड अंपायर आता शॉर्ट रन संदर्भातले निर्णयही रिव्ह्यू करु शकणार आहे.

व्यस्त वेळापत्रकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, जाणून घ्या BCCI आणि कोहलीत काय वाद सुरु आहे?

अंपायर्स कॉलबद्दल काय म्हणाला अनिल कुंबळे??

अंपायर्स कॉलबद्दल आमच्यात खूप चांगली चर्चा झाली आणि सर्व दृष्टीकोनातून आम्ही याचा विचार केला. DRS वापरण्यामागचं प्रमुख उद्दीष्ट हे खेळातील तांत्रिक चुका दुरुस्त करणं हे आहे, अर्थात मैदानावरील अंपायर्सचं महत्वही तितकच महत्वाचं आहे. याच्यात अंदाज हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून अंपायर्स कॉल हा पर्याय राहणं गरजेचं आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp