ICC New Rule : आता संघाला होणार 5 धावांचा दंड, ICC चा 60 सेकंदाचा नवा नियम काय?
ICC Stop Clock Rule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मंगळवारी (21 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी समितीने पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम चाचणीच्या आधारावर लागू करण्यास सहमती दिली आहे.
ADVERTISEMENT
ICC New Rule News : विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा नियम लागू केला जाणार आहे. हा नियम काही महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू केला जाईल आणि जर हा यशस्वी ठरला तर लवकरच क्रिकेटच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. नवा नियम गोलंदाजीबद्दल आहे. 60 सेकंदाच्या वेळ मर्यादेचे पालन झाले नाही, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावांचा दंड होणार आहे. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या चुकीमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत 5 धावांची भर पडणार आहे. (icc new rule 2023 for bowling team five run penalty slow over rate)
ADVERTISEMENT
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत मुख्य कार्यकारी समितीने पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम चाचणीच्या आधारावर लागू करण्यास सहमती दिली आहे. हा नियम डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत चाचणी आधारावर लागू केला जाणार आहे.
काय आहे stop clock rule?
दोन षटकांमधील वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. या नियमानुसार, जर गोलंदाजी करणारा संघ त्याच्या मागील षटकानंतर 60 सेकंदात पुढील षटक टाकण्यास तयार झाला नाही. आणि हे डावात तिसऱ्यांदा घडल्यास 5 धावांचा दंड केला जाईल. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला आयत्या 5 धावा मिळणार आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> World Cup 2027 : पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या
श्रीलंकेने गमावली यजमानपदाची संधी
याच आयसीसीच्या बैठकीत श्रीलंका क्रिकेटच्या बोर्ड बरखास्त करण्याच्या निर्णयावरही चर्चा झाली. बोर्ड बरखास्त अटींवरही निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकेल आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्येही सहभागी होऊ शकेल.
हे ही वाचा >> MS Dhoni : ‘…तेव्हा तुम्हाला धोनीची खरी किंमत कळेल’, नेहराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
पण, आता 19 वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपदही श्रीलंकेकडून हिसकावून घेतले आहे. आता पुढील वर्षी होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेला मिळणार आहे. अलीकडेच सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT