ICC Odi Ranking 2023: शुभमन गिलने बाबरला पछाडलं! बनला वर्ल्ड नंबर 1 बॅटसमन

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

icc odi ranking 2023 shubman gill number 1 batsman one day format baber azam fall mohmmed siraj bowler world cup 2023
icc odi ranking 2023 shubman gill number 1 batsman one day format baber azam fall mohmmed siraj bowler world cup 2023
social share
google news

Icc Odi Ranking Shubman Gill Mohmmed Siraj Number 1 : पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमला (Babar Azam) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill)  बाबर आझमला पछाडत 1 नंबरच टायटल पटकावलं आहे. तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj)  शाहिन आफ्रिदीला (Shahin Afridi) धक्का देत त्याचंही वर्ल्ड नंबर वनचं टायटल हिसकावलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला (Pakistan) दुहेरी झटका बसलाय. (icc odi ranking 2023 shubman gill number 1 batsman one day format baber azam fall mohmmed siraj bowler world cup 2023)

गिल दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत

आयसीसीने नुकतीच वनडेच रँकींग (Icc Odi Ranking 2023) जाहीर केली आहे. या रँकींगमध्ये शुभमन गिलने बाबरला धक्का देत त्यांच्याकडून 1 नंबरच टायटल हिसकावलं आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये गिल चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली होती.तर बाबर आझम हा वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरताना दिसला आहे. याचाच फटका बाबरला बसला असून त्याने फलंदाजीतील वनडे रॅकींगमधलं पहिलं स्थान गमावलं आहे. आणि पहिल्या स्थानी टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल पोहोचला आहे. या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक गाठणारा गिल हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

हे ही वाचा : हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडले गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, जखमी जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?

सिराजने गाठलं पहिलं स्थान

वनडे रॅकींगमध्ये मोहम्मद सिराजने पाकिस्तानला धक्का दिला आहे. सिराजने शाहिन आफ्रिदीला पछाडत पहिला क्रमांक पटकावला आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सिराजने 10 विकेट्स घेतले आहेत. कुलदीप यादव तिसऱ्या स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर आणि मोहम्मद शमी 10व्या स्थानावर आहेत. वर म्हणजेच टीम इंडियाच्या गोलंदाजांना विश्वचषकात त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे बक्षीस उत्कृष्ट मानांकनाच्या रूपाने मिळाले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ऑलराऊंडरमध्ये ‘हा’ खेळाडू अव्वल

अँजेलो मॅथ्यूजविरूद्ध टाईम आऊटची अपिल करून वादात सापडलेला व सध्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप बाहेर पडलेला बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅक्सवेलच्या दुहेरी शतकानंतर त्याने दोन स्थानांनी सुधारणा करत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : …तर फडणवीसांच्या थेट गळ्यातच पडतो, जरांगे पाटील काय म्हणाले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT