समोरचा शिवी देत असेल तर तुम्ही तीन द्या, दोन तुमच्या भाषेत आणि..शास्त्रींचा खास गुरुमंत्र
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकवून देण्यात विराट कोहलीप्रमाणे रवी शास्त्रीही अपयशी ठरले असले तरीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने परदेशात काही आश्वासक विजय मिळवले. ज्यात ऑस्ट्रेलियात 3-1 ने मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाचाही समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला स्लेजिंगसाठी ओळखला जातो. […]
ADVERTISEMENT

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकवून देण्यात विराट कोहलीप्रमाणे रवी शास्त्रीही अपयशी ठरले असले तरीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने परदेशात काही आश्वासक विजय मिळवले. ज्यात ऑस्ट्रेलियात 3-1 ने मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाचाही समावेश होता.
ऑस्ट्रेलियाचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला स्लेजिंगसाठी ओळखला जातो. परंतू शास्त्री यांनी या स्लेजिंगचा सामना करण्यासाठी आपल्या संघाला एक खास गुरुमंत्र दिली होता. गार्डीअन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी हा खुलासा केला आहे.
भारतीय संघाने कसं खेळावं यासाठी माझं चित्र स्पष्ट होतं. तुम्हाला आक्रमक आणि इतरांच्या मनात धडकी भरेल असं खेळायचं आहे, तुमचा फिटनेस कायम राखून खेळायचं आहे, परदेशात जाऊन 20 विकेट घेण्याची क्षमता असलेले बॉलर्स तयार करायचे आहेत. विशेषकरुन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना तुमचा attitude तसा असायला हवा. मी खेळाडूंना सांगितलं जर समोरुन तुम्हाला कोणी एक शिवी देत असेल तर तुम्ही तीन शिव्या द्या…दोन तुमच्या भाषेत द्या आणि एक त्यांच्या भाषेत.
रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑस्ट्रेलियात दोनवेळा कसोटी मालिका जिंकली आहे. ज्यात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. प्रशिक्षणातून निवृत्ती घेतलेले रवी शास्त्री सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहेत.