Ind vs Aus : अहमदाबाद कसोटी ड्रॉ झाली तर भारताचं काय होणार, कसं असेल WTCचं गणित?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

India vs Australia WTC Final Scenario : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबादमध्ये खेळवला जात असलेला टेस्ट सामना ड्रॉच्या दिशेने वळताना दिसत आहे. कारण या सामन्याचा तिसरा दिवस संपत आला असता तरी अद्याप पहिलाच डाव सुरु आहे. त्यामुळे या सामन्याची ड्रॉच्या दिशेने वाटचाल सूरू झाली आहे.त्यामुळे या ड्रॉ सामन्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेवर किती फरक पडणार आहे? तसेच टीम इंडिया WTCची फायनल गाठणार का?नेमकं WTCसमीकरण कसे बदलणार आहे, हे जाणून घेऊयात. (ind vs aus ahmadabad test result draw world test championship points table updates)

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

WTC चा फायनल सामना येत्या 7 जुनला लंडनचा ओव्हल मैदानात रंगणार आहे. या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाने (Australia) तिसरा टेस्ट सामना जिंकून पात्रता मिळवली आहे. आता चौथा सामना जर टीम इंडियाने (India) जिंकला तर त्यांची फायनलमध्ये एंन्ट्री होणार आहे. मात्र सामना पाहता ते शक्य वाटत नाही आणि तो ड्रॉच्या दिशेने वळताना दिसतोय. तसेच या शर्यतीतल श्रीलंका देखील आहे. जी न्यूझीलंड विरूद्ध टेस्ट सामने खेळतेय.

Rohit Sharma: रोहितची धोनी, तेंडुलकरच्या क्लबमध्ये एन्ट्री, ठरला 6वा भारतीय

हे वाचलं का?

सामन्याच्या ड्रॉ नंतरही भारताला संधी

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सुरु असलेला सामना जर ड्रॉ झाला, तर सर्वांच्या नजरा श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड (srilanka vs new zealand) सामन्याकडे लागणार आहे. कारण या सामन्यातूनच WTC चा दुसरा फायनलीस्ट सापडणार आहे. श्रीलंका जर दोन्ही सामने जिंकते तर ती फायनलमध्ये पोहोचेल. आणि श्रीलंका जर एकही सामना हरली तर टीम इंडिया फायनल गाठू शकते.

Shaun Marsh retirement : ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडू शॉन मार्शने घेतली निवृत्ती

ADVERTISEMENT

WTCचं समीकरण कसे असणार?

  • दोन टेस्ट सामन्यांच्या टेस्ट सीरीजमध्ये जर श्रीलंकेन न्युझीलंडला (srilanka vs new zealand) क्लीन स्वीप केले, तर श्रीलंका फायनलमध्ये दाखल होणार आहे.

ADVERTISEMENT

  • श्रीलंका न्युझीलंड (srilanka vs new zealand) यांच्यातील एकही सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTCच्या फायनलमधलं स्थान पक्क करेल.

  • तसेच न्युझीलंड विरूद्ध दोन टेस्ट सामन्यातील श्रीलंका एकही सामना हरली तर, टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचता येणार आहे.

  • IPL 2023 च्या ऑक्शनमधून क्रिस वोक्सने घेतली माघार,’हे’ आहे कारण

    चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत टीम इडिया 2-1 ने आघाडीवर आहे. आता चौथा सामना ड्रॉ होतो की टीम इंडियाला विजयाची संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चौथ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाने 3 विकेट गमावून 289 धावा पुर्ण केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या डावात किती धावापर्यंत मजल मारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT