World Cup फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलियाशी भिडणार, क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ind vs aus final world cup 2023 australia defeates south africa by 3 wicket team india
ind vs aus final world cup 2023 australia defeates south africa by 3 wicket team india
social share
google news

Ind vs Aus odi World cup 2023 Final : वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सेमी फायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने (Australia)  3 विकेट राखून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला आहे. हा पराभव करून आता आस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (World cup 2023 Final) आता ऑस्ट्रेलिया भारताशी भिडणार आहे. हा फायनल सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्याची आता क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. (ind vs aus final world cup 2023 australia defeate south africa by 3 wicket team india)

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र फलंदाजी घेऊन सुद्धा आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सेमी फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिका निव्वळ 212 धावावर ऑल आऊट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 213 धावांच आव्हान होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने फायनल सामन्यात एन्ट्री मारली.

हे ही वाचा : ठाकरेंच्या ‘त्या’ दोन नेत्यांनी…, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलर आणि क्लासेनला वगळता एकालाही मोठी धावसंख्या करता आली नाही. डेविड मिलरने एकाकी झूंज देत 101 धावा केल्या. तर क्लासेनने त्याला 47 धावांची साथ दिली. या धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिका सर्ववाद 212 च धावा करू शकली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे आव्हान ऑस्ट्रेलियासाठी खूपच सोप्प होतं. त्यामुळे आस्ट्रेलिया अवघ्या काही ओव्हरमध्ये हे आव्हान पुर्ण करेल असे वाटत होते. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सहजासहजी सामना हातातून सोडू दिला नाही. ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट काढल्या. ऑस्ट्रेलियाला सामन्यात तगडी झूंज दिली. जर आणखीण काही धावा दक्षिण आफ्रिका उभारू शकली असती, तर कडवी झूंज देता आली असती.

हे ही वाचा : Shiv Sena: ‘बाप चोरणारे.. जे गुवाहटी, सूरतला पळून गेले त्यांनी..’, राड्यानंतर आदित्य ठाकरे संतापले

दरम्यान आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला भारताशी सामना करायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. 19 नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. टीम इंडियाला 2003 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. पराभवाचा बदला घेण्याची टीम इंडियाला संधी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT