Ind vs Aus : वनडे मालिकेपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघातून आऊट
Ind vs Aus Odi Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्धची टेस्ट मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये येत्या 17 मार्चपासून वनडे मालिकेला सूरूवात होणार आहे.या वनडे मालिकेपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins)भारतात परतणार नाही आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसणार आहे. पॅट […]
ADVERTISEMENT
Ind vs Aus Odi Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्धची टेस्ट मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये येत्या 17 मार्चपासून वनडे मालिकेला सूरूवात होणार आहे.या वनडे मालिकेपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins)भारतात परतणार नाही आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसणार आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत टेस्टप्रमाणे आता वनडेतही स्टीव्ह स्मिथ (steve smith) संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली होती आता वनडे ते कसे कामगिरी करतात हे पाहावे लागणार आहे.(ind vs aus steve smith odi captain against india pat cummins out to the one day series)
ADVERTISEMENT
येत्या 17 मार्चपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) भारतात परतणार नाही आहे, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. आता पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ (steve smith) संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. टेस्ट मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. यामध्ये स्मिथच्या नेतृत्वाखाली तिसरा टेस्ट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर चौथा सामना ड्रॉ करण्यात स्मिथ यशस्वी झाला होता. त्यामुळे आता वनडे मालिकेचे नेतृत्व देखील स्मिथ करणार आहे.
Shreyas Iyer पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त; IPL मध्ये खेळणार का?
हे वाचलं का?
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आईची तबियत खालावल्याने सीरीजमध्ये सोडून गेला होता. त्याच्या आईचे गेल्याच आठवड्यात स्तनाचा कॅन्सर झाल्याने निधन झाले होते. पॅट कमिन्स परतणार नाही आहे. तो फार वाईट परिस्थितीतून जात आहे. आम्ही त्याच्यासोबत आहोत, असे कोच एंड्रयू मॅकडॉनल्ड म्हणाले होते.
WTC Final: ओव्हलच्या मैदानाने वाढवली भारताची चिंता, आकडेवारी काय सांगते?
ADVERTISEMENT
वनडे सीरीजचे वेळापत्रक
-
पहिला सामना : 17 मार्च शुक्रवार मुंबई
ADVERTISEMENT
दुसरा सामना : 19 मार्च, रविवार विशाखापट्टणम
तिसरा सामना : 22 मार्च बुधवार, चेन्नई
icc test championship: भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार; कधी, कुठे होणार फायनल?
दोन्ही संघाचे प्लेईंग इल्वेहन
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन (विकेटकिपर), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT