Ind vs Aus : दोन कर्णधार एकत्र! एक देशाचे दुसरा टीम इंडियाचा, व्हायरल फोटोवर भन्नाट कमेंट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

India vs Australia 4th test Match : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील शेवटचा टेस्ट सामना अहमदाबादच्या स्टे़डिअमवर खेळवला जातोय. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले होते. या दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहे. (ind vs aus test match piyush goyal post pm narendra modi rohit sharma photo users awesome comment o photo)

ADVERTISEMENT

चौथ्या टेस्टमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि एंथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांनी आपआपल्या देशाच्या कर्णधाराची भेट घेऊन त्यांना सन्मानित केले. तसेच खेळाडूंना खास टेस्ट सामन्यासाठी कॅप देखील भेट दिल्या. या दरम्यानचे फोटोही काढण्यात आले होते. यातीलच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हायरल फोटो पियूश गोयल (Piyush goyal) यांनी ट्वीट केला आहे. गोयल यांनी फोटो ट्विट करत त्याला कॅप्टन असे कॅप्शन दिले आहे. या व्हायरल फोटोवर भन्नाट कमेंट येतायत. आतापर्यंत या फोटोवर 45 हजार लाईक आणि 1 हजार 500 कमेंट आल्या आहेत. तर 2 हजार 394 लोकांनी फोटो रिट्वीट केला आहे.

IPL 2023 च्या ऑक्शनमधून क्रिस वोक्सने घेतली माघार,’हे’ आहे कारण

हे वाचलं का?

एका युझरने यावर देशाचे कर्णधार मोदी जी आणि इंडियन टीमचे रोहित शर्मा अशी भन्नाट कमेंट केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काही नेटकऱ्यांनी रोहितला कॅमेरात पाहण्याचा सल्ला दिला आहे.

तर एका युझरने ‘जिंका यावेळेस ट्रॉफी, भारताबाहेर गेली नाही पाहिजे, असा सल्ला मोदी रोहितला देत असल्याचे ट्विट केले आहे.

चौथ्या एका युझरने 2 कर्णधार एकत्र असे भन्नाट कमेंट केले आहे.

चौथ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. हा त्याचा निर्णय योग्य ठरला आहे. कारण ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) नाबाद 133 धावावर खेळत आहे. त्याच्यासोबत कॅमरन ग्रीन 66 धावांवर मैदानावर आहे. बातमी लिहेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पहिला डावाने 4 विकेट गमावून 300 धावा पुर्ण केल्या आहेत. आता ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात किती धावांचा डोंगर उभारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने 2 तर अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

WPL : पोरींनी पहिल्याच फटक्यात केली कमाल… IPL मध्ये दिग्गजांनाही नव्हतं जमलं

दरम्यान चार सामन्याच्या टेस्ट मालिकेल 2-1ने टीम इंडिया (Team india) आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरी टेस्ट जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या WTC च्या फायनलमध्ये स्थान पक्क केले आहे. तर टीम इंडियाला चौथा टेस्ट सामना जिंकावा लागणार आहे. टीम इंडिया जर जिंकली तर ती WTC च्या फायनलसाठी क्वालिफाय होणार आहे. जर टीम इंडियाचा पराभव झाला तर WTCचा प्रवास खडतर असणार आहे.

ना कोहली ना सूर्यकुमार… एबी डिव्हिलियर्सने सांगितला T20तील बेस्ट खेळाडू

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT