WTC Final, Ind vs Aus : काळी पट्टी बांधून खेळाडू मैदानात, ओडिशा रेल्वे अपघाताशी कनेक्शन
India vs Australia WTC Final : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानात आज 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC Final) खेळवली जात आहेत. या सामन्यासाठी उतरताना दोन्ही संघाच्या खेळाडूंनी दंडावर काळ्या पट्टया बांधल्या आहेत.
ADVERTISEMENT
Team India And Australia team wearing black arm guards : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानात आज 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC Final) खेळवली जात आहेत. या सामन्यात टॉस जिंकून टीम इंड़ियाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे, तर ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी सूरू आहे. या सामन्यासाठी उतरताना दोन्ही संघाच्या खेळाडूंनी दंडावर काळ्या पट्टया बांधल्या आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणासाठी खेळाडूंनी दंडावर काळ्या पट्टया बांधल्या आहेत? असा प्रश्न आता क्रिकेट फॅन्सना पडला आहे.(ind vs aus wtc final team wearing black arm guards in remembrance of odisha train accident)
ADVERTISEMENT
टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) आजपासून वर्ल्ड चॅम्पियनशीपचा (WTC Final) सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिय़ाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस उतरली आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरताना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडूं दंडावर काळ्या पट्टया बांधून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे फॅन्सना प्रश्न पडला की खेळाडूंनी दंडावर काळ्या पट्ट्या का बांधल्या आहेत? तर त्याचे उत्तर असे आहे की, ओरिसा ट्रेन दुर्घटनेतील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडूंनी दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.
हे ही वाचा : WTC Final ड्यूक बॉलने खेळवणार, पण टीम इंडियाला SG बॉलची सवय…
ओरिसाच्या बालासोर जिल्ह्यात 2 जून रोजी तीन ट्रेनची भीषण टक्कर झाली. बहनागा स्टेशनजवळ SMVB हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची भीषण टक्कर झाली. या भीषण अपघातात 288 निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 1 हजार हून अधिक नागरीक जखमी झाले होते. या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडूं दंडावर काळ्या पट्टया बांधून उतरले होते. तसेच या सामन्याआधी खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीला मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली होती.
हे वाचलं का?
दोन्ही संघाचे प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार),शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमीन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलैंड
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘निवृत्ती घेण्यासाठी ही योग्य वेळ’, IPL 2023 जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची मोठी घोषणा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT