IndvsEng : आश्विनची ‘शंभर नंबरी’ सेंच्युरी
टीम इंडियाचा स्पिनर रविचंद्रन आश्विनने चेन्नई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. पहिल्या इनिंगमध्ये भारताने ३२९ रन्सपर्यंत मजल मारल्यानंतर भारताने आश्विनच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव १३४ रन्सवर संपवला. पहिल्या इनिंगमध्ये आश्विनने ५ विकेट्स घेतल्या. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आश्विनने बॅटींगमध्ये इंग्लंडच्या बॉलर्सना सळो की पळो करुन सोडत शतकाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आश्विनचं हे शतक […]
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्पिनर रविचंद्रन आश्विनने चेन्नई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. पहिल्या इनिंगमध्ये भारताने ३२९ रन्सपर्यंत मजल मारल्यानंतर भारताने आश्विनच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव १३४ रन्सवर संपवला. पहिल्या इनिंगमध्ये आश्विनने ५ विकेट्स घेतल्या. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आश्विनने बॅटींगमध्ये इंग्लंडच्या बॉलर्सना सळो की पळो करुन सोडत शतकाची नोंद केली.
ADVERTISEMENT
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आश्विनचं हे शतक ऐतिहासीक ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये जिकडे भारताच्या इतर बॅट्समननी हाराकिरी केली. तिकडे आश्विनने कोहलीच्या साथीने महत्वाची पार्टनरशीप करुन टीम इंडियाची बाजू भक्कम केली.
Century and a 5-for by Indians in the same Test match:
R Ashwin – 3 times
All other Indians – 2 times (Mankad in 1952 & Umrigar in 1962)#INDvsENG— Bharath Seervi (@SeerviBharath) February 15, 2021
Indians Scoring Century & Picking Fifer in Same Test
Vinoo Mankad vs ENG (1952)
Polly Umrigar vs WI (1962)
Ravi Ashwin vs WI (2011)
Ravi Ashwin vs WI (2016)
Ravi Ashwin vs ENG (2021)*#INDvsENG— CricBeat (@Cric_beat) February 15, 2021
विराट कोहली मोईन अलीच्या बॉलिंगवर ६२ रन्सवर आऊट झाल्यानंतर आश्विनने कुलदीप आणि सिराजला सोबत घेऊन टीम इंडियाची खिंड लवढत ठेवली आणि आपलं शतक झळकावलं. अखेरीस स्टोनने १०६ रन्सवर आश्विनला क्लिन बोल्ड केलं आणि भारताची दुसरी इनिंग २८६ रन्सवर संपवली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने ४८१ रन्सची मोठी आघाडी घेतली असून इंग्लंडला आता विजयासाठी ४८२ रन्सचं मोठं आव्हान आहे. चेन्नईचं पिच सध्या स्पिनर्स बॉलर्सना मदत करतंय अशावेळी उरलेल्या दोन दिवसांमध्ये इंग्लंडच्या प्लेअर्सना खूप सांभाळून खेळावं लागणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT