आश्विनच्या जाळ्यात अडकले इंग्लंडचे प्लेअर्स, भारताची सामन्यावर पकड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवीन वर्षात पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडकडुन दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. चेन्नईच्या मैदानावर दुसरी टेस्ट खेळताना इंग्लंडला विजयासाठी भारताने ४८२ रन्सचं टार्गेट दिलं. या टार्गेटचा सामना करताना इंग्लंडच्या संघाची दिवसाअखेरीस ३ बाद ५३ अशी अवस्था झाली. चेन्नईचं पिच स्पिनर्सना चांगलीच मदत करतंय. अशा परिस्थितीत इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशी कितपत तग धरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

अवश्य वाचा – होम ग्राऊंडवर आश्विन चमकला, कपिल देवनाही टाकलं मागे

भारतीय संघाकडून तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला तो स्पिनर रविचंद्रन आश्विन. पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट घेतलेल्या आश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये कॅप्टन विराट कोहलीसोबत महत्वपूर्ण पार्टनरशीप केली. इतकच नव्हे तर विराट कोहली आऊट झाल्यानंतर आश्विनने अखेरच्या फळीतल्या बॅट्समनला सोबत घेऊन आपलं शतकही झळकावलं. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सेशनमध्ये भारतीय बॅट्समननी हाराकिरी केली. पण विराट कोहली आणि आश्विनने मोक्याच्या क्षणी संघाचा डाव सावरला.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – Ind vs Eng : चेन्नईत फॅन्सकडून बायो बबल मोडण्याचा प्रयत्न

विराट कोहलीने इंग्लंडच्या बॉलर्सचा सामना करत ६२ रन्स केल्या. रविचंद्रन आश्विनने १४८ बॉलमध्ये १०६ रन्स केल्या. या इनिंगमध्ये आश्विनने १४ फोर आणि १ सिक्स लगावला. स्टोनने आश्विनला क्लिन बोल्ड करत भारताची दुसरी इनिंग २८६ वर संपवली.

ADVERTISEMENT

अवश्य वाचा – IndvsEng : आश्विनची ‘शंभर नंबरी’ सेंच्युरी

ADVERTISEMENT

४८२ रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमने सेकंड इनिंगमध्ये सावध सुरवात केली. अक्षर पटेलने डोम सिबलेला आऊट करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने रोरी बर्न्सही आश्विनच्या बॉलिंगवर आऊट झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपायला अवघ्या काही ओव्हर्स शिल्लक असल्यामुळे इंग्लंडने नाईट वॉचमन जॅक लिचला पुढे पाठवलं. पण अक्षर पटेलने त्यालाही आपल्या जाळ्यात अडकवत इंग्लंडची हालत अधिक नाजूक केली. यानंतर मैदानावर आलेल्या जो रुटलाही भारतीय स्पिनर्सनी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण रुट आणि लॉरेन्स यांनी उरलेल्या ओव्हर्स खेळून काढत इंग्लंडची अधिक पडझड रोखली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT