Lord’s Test रंगतदार अवस्थेत, जो रुटने भारताला तंगवलं, इंग्लंडकडे पहिल्या डावात नाममात्र आघाडी
भारत आणि इंग्लंड यांच्यातला लॉर्ड्स कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. कर्णधार जो रुटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने भारतावर पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसातली पहिली दोन सत्र गाजवल्यानंतर भारतीय बॉलर्सने अखेरच्या सत्रात कमबॅक करत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. दिवसाच्या शेवटच्या बॉलवर इंग्लंडचा जेम्स अँडरसन शमीच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला. इंग्लंडचा पहिला डाव ३९१ […]
ADVERTISEMENT
भारत आणि इंग्लंड यांच्यातला लॉर्ड्स कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. कर्णधार जो रुटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने भारतावर पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसातली पहिली दोन सत्र गाजवल्यानंतर भारतीय बॉलर्सने अखेरच्या सत्रात कमबॅक करत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. दिवसाच्या शेवटच्या बॉलवर इंग्लंडचा जेम्स अँडरसन शमीच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला.
इंग्लंडचा पहिला डाव ३९१ रन्सवर संपुष्टात आला असून त्यांच्याकडे सध्या २७ धावांची आघाडी आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांत शर्माने ३ तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या.
तिसऱा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने. रुटने सर्वात आधी जॉनी बेअरस्टोसोबत महत्वाची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. या भागीदारीमुळे भारतीय बॉलर्स बॅकफूटवर ढकलले गेले. मोहम्मद सिराजने बेअरस्टोला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. बेअरस्टो आऊट झाल्यानंतर जोस बटलर आणि मोईन अली यांनीही जो रुटला चांगली साथ देत भारतीय बॉलर्सना चांगलंच तंगवलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Video : क्रिकेटच्या पंढरीत प्रेक्षकांचं लाजिरवाणं कृत्य, लोकेश राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क
इशांत शर्माने बटलर, मोईन अली आणि सॅम करन यांना माघारी धाडत मोक्याच्या क्षणी इंग्लंडला धक्का दिला. यादरम्यान इंग्लंडने जो रुटच्या खेळाच्या जोरावर आघाडी घेतली. इंग्लंडच्या तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी आजचा दिवस खेळून काढण्याचा प्रयत्न केला. परंतू मोहम्मद शमीने अखेरच्या बॉलवर जेम्स अँडरसनला आऊट करत इंग्लंडचा दुसरा डाव संपुष्टात आणला. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांमध्ये आश्वासक आघाडी घेऊन इंग्लंडला विजयासाठी आव्हान देण्याचं मोठं काम भारतीय संघाला करावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
Ind vs Eng 2nd Test : Joe Root च्या शतकामुळे इंग्लंडचा डाव सावरला, तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर निष्प्रभ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT