Ind vs Eng 2nd Test : पहिल्या इनिंगमध्ये भारताची ३६४ पर्यंत मजल, जाडेजा-पंतची एकाकी झुंज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ रन्सपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ३ विकेट गमावत २७६ रन्सचा पल्ला गाठलेल्या भारताची दुसऱ्या दिवसातली सुरुवात अडखळती झाली. परंतू जाडेजा आणि पंतने एकाकी झुंज देत भारताला आव्हानात्मक धावसंख्येचा पल्ला गाठून दिला. याव्यतिरीक्त भारताच्या सर्व फलंदाजांनी निराशा केली.

दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात भारताला लोकेश राहुलच्या रुपाने मोठा धक्का बसला. रॉबिन्सनने त्याला आऊट केलं. २५० बॉलमध्ये १२ फोर आणि १ सिक्स लगावत राहुलने १२९ रन्सची इनिंग खेळली. यापाठोपाठ अजिंक्य रहाणे जेम्स अँडरसनच्या बॉलिंगवर सोपी कॅच देऊन माघारी परतला. आश्वासक सुरुवातीनंतर भारताचा संघ ५ बाद २८२ अशा परिस्थितीत सापडला. यानंतर मैदानावर आलेल्या पंत आणि जाडेजाने फटकेबाजी करत भारताला त्रिशतकी टप्पा गाठून दिला.

दोघांनीही सहाव्या विकेटसाठी ४९ रन्सची पार्टनरशीप केली. ही जोडी इंग्लंडला महागात पडणार असं वाटत असतानाच मार्क वुडने पंतला आऊट केलं. यानंतर रविंद्र जाडेजाने अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला खरा…पण त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह हे ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. अखेरीस मार्क वुडने जाडेजाला ४० रन्सवर आऊट करत भारताचा पहिला डाव संपवला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने भारताचा निम्मा संघ गारद केला. त्याला रॉबिन्सन आणि वूडने प्रत्येकी २-२ तर मोईन अलीने १ विकेट घेत चांगली साथ दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT