आधी ब्रॉडला धुतला मग फलंदाजांना नाचवलं अन् नंतर पाहायला मिळाला ‘Flying Bumrah’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) कर्णधार म्हणून पहिली कसोटी चांगली जात आहे. इंग्लंडसोबतच्या पाचव्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार केले आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार बुमराहने प्रथम बॅटने फटकेबाजी केली आणि नंतर चेंडूने अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवत सर्वांनाच चकित केले.

बुमराहने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा जबरदस्त झेल घेत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला, ज्यामध्ये त्याला शार्दुल ठाकूरची साथ मिळाली. मात्र, या दोघांनीही यापूर्वी अशीच चूक करून अडचणी वाढवल्या होत्या, जी नंतर सुधारण्यात आली.

चर्चा आहे सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची. इंग्लंडच्या पाच विकेट आधल्या दिवशी पडल्या होत्या, त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) क्रीजवर होते. पहिल्या अर्ध्या तासात दोघांना काही अडचणींचा सामना करावा लागला, पण नंतर आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत भारत विकेटच्या शोधात होता आणि बेन स्टोक्सने ही संधी दिली. स्टोक्सने मोहम्मद शमीचा चेंडू हवेत उंचावला, पण कव्हर्सवर असलेल्या शार्दुल ठाकूरने झेल सोडला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बुमराहने शार्दुलची चूक सुधारली

स्टोक्सला दिलासा मिळाला, पण काही वेळाने त्याने पुन्हा भारताला संधी दिली. यावेळी गोलंदाज शार्दुल ठाकूर होता आणि क्षेत्ररक्षक कर्णधार बुमराह होता, जो मिडऑफला उभा होता. चेंडू थेट बुमराहकडे आला, मात्र बुमराहने हा झेलही सोडला. सर्वजण बघतच राहिले आणि स्टोक्सला पुन्हा एकदा जिवदान मिळाले.

ADVERTISEMENT

पण आतापर्यंत या कसोटीत बुमराह सतत काहीतरी अप्रतिम कामगिरी करत आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण कसं चुकलं असेल. पुढचा चेंडू स्टोक्सने पुन्हा मिडऑफच्या दिशेने उचलला आणि यावेळी बुमराहने डाव्या बाजूला हवेत उडी मारली, दोन्ही हात पसरले आणि आश्चर्यकारक झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT